Tarun Bharat

बाजारात सेन्सेक्स, निफ्टीची सकारात्मक वाटचाल

Advertisements

सेन्सेक्समध्ये 271 अंकांची तेजी : ऑटो, धातू कंपन्या नफ्यात

वृत्तसंस्था / मुंबई

गुरूवारी चौथ्या दिवशीही शेअर बाजाराने तेजीचा कल कायम राखण्यात यश मिळवलं आहे. सेन्सेक्सच्या निर्देशांकात 271 अंकांची तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी निर्देशांकातही 106 अंकांची तेजी दिसून आली. बाजाराला धातू, ऑटो आणि टेक कंपन्यांच्या समभागांच्या झालेल्या खरेदीचा फायदा उठवता आला.

गुरूवारी सरतेशेवटी सेन्सेक्सचा निर्देशांक 271 अंकांच्या वाढीसह 48,949.76 अंकांवर तर निफ्टी निर्देशांक 106 अंकांच्या वाढीसह 14,724.80 अंकांवर बंद झाला. भारतीय भांडवली बाजारात गुरुवारी खरेदीवर गुंतवणूकदारांनी भर दिला आहे. बँकिंग समभागांमध्ये खरेदीचा माहोल असल्याने बँक निफ्टी निर्देशांकाने तेजी दर्शविली होती. भारतीय शेअर बाजाराने सकाळी तेजीसह सुरुवात केलेली पाहायला मिळाली. सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांनी तर निफ्टी निर्देशांक 50 अंकांच्या वाढीसह सकाळी खुला झाला होता. आयडीबीआय बँकेचे समभाग तेजीत होते. सदरच्या बँकेच्या समभागाने 9 टक्के इतकी उसळी नोंदवली होती. प्री-टेडिंगनंतरच्या काळात एनएसईच्या संकेतस्थळावर अडथळे जाणवले. पण अर्ध्या तासानंतर सुधारणा होऊन एनएसईवरचे व्यवहार पूर्ववत झाले. सकाळी 10 वा. सेन्सेक्समधील 32 समभाग तेजीत तर 18 नुकसानीत होते. शेअर बाजाराला धातू, ऑटो व फार्मा कंपन्यांच्या समभागांनी चांगला आधार दिला. सरकारी बँका व आयटी निफ्टी निर्देशांकात घसरण दिसून आली.

एनएसई निफ्टीतील इंडोको रेमेडिज, इंडियन एनर्जी एक्स्चेंज, टाटा स्टील, मॅरिको, सेरा सॅनिटीवेअर यांचे समभाग तेजीत होते. सकाळच्या सत्रात सेन्सेक्समध्ये बजाज ऑटो, बजाज फायनान्स, एचडीएफसी, टायटन, नेस्ले, ओएनजीसी, कोटक बँक, मारुती, एल अँड टी चे समभाग तेजी राखून होते. रिलायन्स, ऍक्सिस बँक, डॉ. रेड्डी, टेक महिंद्राचे समभाग नुकसानीत होते. एचसीएल टेक, सन फार्मा, भारती एअरटेल व पॉवरग्रिड कॉर्पचे समभागही घसरण नोंदवत होते.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • हिंडाल्को…….. 385
 • हिरो मोटो कॉर्प. 2913
 • विप्रो…………. 512
 • टाटा मोटर्स…. 301
 • आयशर मोटर्स 2443
 • टाटा स्टील… 1100
 • बजाज ऑटो.. 3941
 • एचडीएफसी. 2430
 • बीपीसीएल…. 434
 • ग्रेसीम……… 1447
 • टेक महिंद्रा….. 977
 • जेएसडब्ल्यू स्टील 729
 • इन्फोसिस…. 1361
 • मारुती सुझुकी 6666
 • टायटन…….. 1444
 • कोल इंडिया…. 134
 • नेस्ले………. 16717
 • कोटक महिंद्रा 1788
 • आयसीआयसीआय 608
 • एचसीएल टेक. 916
 • डीव्हीस लॅब्ज 4063
 • आयटीसी……. 202
 • रिलायन्स…. 1931
 • टीसीएस…… 3118
 • आयओसी……… 92
 • अल्ट्राटेक सिमेंट 6405
 • अदानी पोर्टस्.. 740

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • युपीएल……… 633
 • पॉवरग्रिड कॉर्प 215
 • एनटीपीसी….. 103
 • बजाज फिनसर्व्ह 11027
 • ओएनजीसी…. 110
 • एशियन पेंटस् 2549
 • इंडसइंड बँक… 924
 • सन फार्मा…… 679
 • सिप्ला……….. 884
 • एचडीएफसी लाईफ….. 671
 • श्री सिमेंटस् 27736
 • एसबीआय इन्शु 969
 • भारती एअरटेल 558
 • ऍक्सिस बँक    715

Related Stories

कल्याण ज्वेलर्सच्या 150 व्या शाखेचे उदघाटन

Patil_p

आगामी दशकात मांस उद्योगात तेजीचे संकेत

Patil_p

तिसऱया दिवशी सेन्सेक्सची 460 अंकांची उसळी

Patil_p

कू ऍपचे दीड कोटी ग्राहक

Patil_p

कर्मचाऱयांच्या लसीकरणाचा खर्च महिंद्रा उचलणार

Patil_p

30 टक्के विक्रीत वाढीची मर्सिडीझला आशा

Patil_p
error: Content is protected !!