Tarun Bharat

बाजारात सेन्सेक्स 374 अंकांनी मजबूत

Advertisements

लसीकरण मोहिमेसह जागतिक संकेताचा सकारात्मक परिणाम

वृत्तसंस्था / मुंबई

चालू आठवडय़ात सोमवार व मंगळवार या सलगच्या दोन दिवशी भारतीय भांडवली बाजार सुरू राहिला होता. परंतु बुधवारी रामनवमी असल्याच्या कारणामुळे शेअर बाजार बंद होता. यामुळे एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा बीएसई सेन्सेक्स गुरुवारी नेहमीप्रमाणे सुरु राहिला असून दिवसअखेर सेन्सेन्स 375 अंकांच्या तेजीसह बंद होण्यात यशस्वी झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रभावामुळे गेले दोन दिवस सेन्सेक्स घसरण नेंदवत बंद झाला होता. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि कोटक बँक यांच्या मदतीने गुरूवारी सेन्सेक्सने तेजी प्राप्त करण्यात यश मिळवले आहे.

दिग्गज कंपन्यांच्या कामगिरीनंतर बीएसई सेन्सेन्स 374.87 अंकांनी वधारुन निर्देशांक 48,080.67 वर बंद झाला आहे. प्रारंभीच्या काळात सेन्सेक्समध्ये 501 अंकांची घसरण नोंदवली गेली होती. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर 109.75 अंकांसह 0.77 वर मजबूत होत निर्देशांक 14,406.15 वर बंद झाला आहे.

बीएसई सेन्सेक्समधील प्रमुख कंपन्यांमध्ये आयसीआयसीआय बँकेचे समभाग 3 टक्क्यांनी तेजीत राहिले होते, यासह एचडीएफसी बँक, स्टेट बँक, कोटक बँक आणि बजाज फायनान्स यांचेही समभाग तेजीत राहिल्याची नोंद केली आहे. अन्य  कंपन्यांमध्ये मात्र टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेन्ट्स, टेक महिंद्रा आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.

बाजारातील तेजीची कारणे

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आणि त्यासोबत व्यापक स्वरुपात करण्यात येत असलेल्या लसीकरण मोहिमेमुळे भारतीय शेअर बाजारात मजबूत स्थिती राहिल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. पहिले दोन दिवस बाजार घसरणीत होता. जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे आणि आर्थिक कंपन्यांच्या समभागातील मागणीमुळे भारतीय बाजार सावरला असल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • आयसीआयसीआय 579
 • एचडीएफसी.. 2479
 • बजाज ऑटो… 3682
 • एचडीएफसी बँक 1422
 • स्टेट बँक………. 336
 • कोटक महिंद्रा. 1732
 • बजाज फायनान्स 4691
 • ऍक्सिस बँक….. 658
 • आयटीसी…….. 205
 • डॉ. रेड्डीज लॅब 5199
 • लार्सन ऍण्ड टुब्रो 1337
 • ओएनजीसी….. 103
 • रिलायनस इंडस्ट्रीज 1906
 • बजाज फिनसर्व्ह 9841
 • पॉवरग्रिड कॉर्प. 204
 • भारती एअरटेल 530
 • मारुती सुझुकी 6650
 • इन्फोसिस….. 1351
 • विप्रो………….. 486
 • जेएसडब्लू स्टील 640
 • अदानी पोर्ट….. 737

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • टायटन……… 1480
 • हिंदुस्थान युनि 2349
 • एशियन पेन्ट्स 2509
 • नेस्ले……….. 16778
 • अल्ट्राटेक सिमेंट 6093
 • टेक महिंद्रा…… 968
 • महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 799
 • इंडसइंड बँक…. 835
 • टीसीएस……. 3119
 • सन फार्मा……. 640
 • एचसीएल टेक.. 961
 • पिरामल एन्टर 1657
 • हिंडाल्को……… 355
 • सिप्ला………… 944
 • कोलगेट…….. 1515
 • रिलायन्स इन्फ्रा.. 33
 • डाबर इंडिया… 565
 • बायोकॉन…….. 399
 • एबीबी इंडिया 1389
 • आयशर मोर्ट्स 2337
 • आयओसी………. 87
 • अंबुजा सिमेंट… 295
 • ग्लेनमार्क………… 567
 • टोरंटो फार्मा….. 2581

Related Stories

जगातील आयटी क्षेत्रावर मंदीचे सावट ?

Amit Kulkarni

क्रेडिट कार्डद्वारे खर्चाच्या प्रमाणात वाढ

Patil_p

16 फर्म्सनी ‘आयपीओ’तून उभारले 31 हजार कोटी

Omkar B

बीएस- 6 श्रेणीतील होंडा ग्रेझीया नव्या रुपात

Patil_p

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा अंदाज मूडीजने घटविला

Amit Kulkarni

ऍमेझॉन, वेरीझॉन व्होडाफोन आयडियात गुंतवणूक करणार

Patil_p
error: Content is protected !!