Tarun Bharat

बाणस्तारी भागात चोवीस तास सुरळीत वीज पुरवठा-मंत्री गोविंद गावडे

Advertisements

साडेतीन कोटी खर्चुन वीज उपकरणे बदलण्याच्य कामाला प्रारंभ

प्रतिनिधी / फोंडा

बाणस्तारी भागातील नागरिकांची वीजेची समस्या सोडविण्यासाढी आपण बांधिल असून येत्या दिवस येथील नागरिकांना सुरळित वीज पुरवठा होणार असल्याचा विश्वास सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी दिला.

   बाणस्तारी येथे वीज ट्रान्सफॉमर्सची पायाभरणी व या भागातील जिर्ण झालेल्या विद्युत उपकरणाच्या बदली कामाचा शुभारंभ कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्याहस्ते नुकताच करण्यात आला. यावेळी त्याच्यासमवेत भोम अडकोणचे सरपंच सुनिल भोमकर, तिवरे वरगांवच्या सरपंच उन्नती नाईक, बेतकी खांडोळय़ाचे सरपंच दिलीप नाईक, जि. प. सदस्य श्रमेश भोसले, वीज अभियंते सामंत, पंचसदस्य व नागरिक उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मंत्री गोविंद गावडे म्हणाले की वारंवार गायब होणाऱया वीज समस्येत वाढ होत असल्यामुळे विद्युत उपकरणे बदलण्याचा कामाला सुरूवात करण्यात आलेली आहे. नादुरूस्त स्थितीत असलेले वीजेची उपकरणे बदलण्यात येणार असून मोडकळीस आलेली खांबाचे नुतनीकरण करण्यात येईल. तीन्ही पंचायत क्षेत्रात हे काम हाती घेण्यात आलेले आहे. सुमारे साडेतीन कोटी खर्चुन काम हाती घेण्यात आले आहे.

   खांडोळा पंचायत क्षेत्रासाठी वीज उपकेंद्राचे कामाला सुरूवात होईल. प्रियोळ मतदार संघातील माशेल सद्या शहरीकरणाकडे वळत असून विद्युत वीजवाहिन्याचे काम येत्या दिवसात प्रारंभ करण्यात येईल. सरपंच सुनिल भोमकर म्हणाले की प्रियोळ मतदार संघाचा विकासासाठी मंत्री गोविंद गावडे यांचे सहकार्य मिळत आहे. अवघ्या चार वर्षात पंचायत क्षेत्रातील प्रभागात विकासकामे झालेली आहे.स्वागत व आभार सुनिल भोमकर यांनी केले.

Related Stories

कोरोनामुळे गोव्यात शाळा गळतीचे प्रमाण वाढले

Amit Kulkarni

डिचोली बाजार 50 टक्केच भरला, तरीही सामाजिक अंतराचे तीनतेरा

Amit Kulkarni

प्रदीप सावंत यांची राष्ट्रीय सेवा कार्य गौरव पुरस्कारासाठी निवड

Amit Kulkarni

नवे शैक्षणिक धोरण पुढील वर्षापासून

Patil_p

गांजा लागवडीस खतपाणी घालू नये

Patil_p

‘कर्लिज’ बेकायदेशीरच, जमीनदोस्त करा!

Amit Kulkarni
error: Content is protected !!