Tarun Bharat

बाधितांच्या संख्येत किंचित घट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात मागील तीन दिवस सलग 18 हजारांच्या वर असणारी बाधितांची संख्या सोमवारी किंचितशी घटली. मागील 24 तासात 15 हजार 388 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 77 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 12 लाख 44 हजार 786 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 57 हजार 930 एवढी आहे. 

सोमवारी 16,596 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 08 लाख 99 हजार 394 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या देशात 1 लाख 87 हजार 462 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

देशात आतापर्यंत 22 कोटी 27 लाख 16 हजार 796 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 07 लाख 48 हजार 525 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.08) करण्यात आल्या. 

Related Stories

”यापुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही”

Archana Banage

लेहमध्ये जाणवले भूकंप धक्के; 4.6 रिश्टल स्केल तीव्रता

Tousif Mujawar

बजाज ऑटोचा नफा वाढला

Patil_p

किरकोळ महागाई दर फेब्रुवारीत 6.44 टक्के

Patil_p

पंजाबमध्ये विजेचे संकट गडद

Amit Kulkarni

गृह-संरक्षण विभागातील नोकरीत ‘अग्निवीरां’ना 10 टक्के आरक्षण

Patil_p
error: Content is protected !!