Tarun Bharat

बाधितांच्या संख्येत किंचित घट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

देशात रविवारच्या तुलनेत सोमवारी बाधितांची संख्या किंचितशी घटली. मागील 24 तासात 1 लाख 68 हजार 063 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. रविवारच्या तुलनेत बाधितांचा हा आकडा 11,600 नी कमी नोंदवला गेला. दरम्यान, सोमवारी दिवसभरात 69 हजार 959 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 277 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील पॉझिटिव्हीटी रेट 10.64 % आहे.

सध्या देशात 8 लाख 21 हजार 446 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत देशात ओमिक्रॉन बाधितांची संख्या 4461 एवढी आहे.

देशात आतापर्यंत 69 कोटी 31 लाख 55 हजार 280 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 15 लाख 79 हजार 928 कोरोना चाचण्या सोमवारी (दि.10) करण्यात आल्या.

Related Stories

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणाचा सखोल तपास व्हावा

Patil_p

जखमी माकडाची काळजी

Patil_p

आता समान नागरी संहितेची वेळ!

Patil_p

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्री सामंत यांच्यासमोर मांडल्या व्यथा

Abhijeet Khandekar

दिल्ली उपराज्यपालांचे अधिकार वाढणार

Patil_p

कुडोपी टेंबवाडी येथील युवकाचा नदीपात्रात बुडून मृत्यू

Anuja Kudatarkar