Tarun Bharat

बाबरी पाडली तेव्हा येरे गबाळे पळून गेले : उद्धव ठाकरे

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 


अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी ‘ तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे! येर गबाळ्याचे काय काम!! या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा उल्लेख केला. त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशिद प्रकरणाची आठवण भाजपला करून दिली. 


ते म्हणाले, बाळासाहेबांची आक्रमकता ही बाबरी पाडली तेव्हा दिसली. देवेंद्रजी म्हणतात हे येड्या गबाळ्याचं काम नाही पण जेव्हा बाबरी पाडली तेव्हा येरे गबाळे पळून गेले होते. कोणी पाडली बाबरी विचारले. राम मंदीरासाठी जनतेकडून पैसे मागता कारण आमचे नाव दिसले पाहिजे. 


पुढे ते म्हणाले, भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. तेव्हढी त्यांची पात्रता नाही. जम्मू काश्मीरमध्ये युती करताना भाजपचे हिंदुत्व कुठे गेले होते? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. 

Related Stories

मनपा सप्टेंबर, तर झेडपी निवडणूक ऑक्टोबरमध्ये घ्या! ‘रानिआ’ची सुप्रीम कोर्टाला विनंती

Rahul Gadkar

आज बाळासाहेब असते तर म्हणाले असते, नारायण…

Archana Banage

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

Archana Banage

वेंगुर्लेतील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पाठिशी

Tousif Mujawar

”महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर त्यामुळे नरेंद्र मोदी तिथला दौरा करत असतील”

Archana Banage

गडकिल्ल्यांवर दारू पाटर्य़ा, गोंधळ घातल्यास 6 महिन्यांचा कारावास

prashant_c
error: Content is protected !!