Tarun Bharat

बाबर आझम, ऍलीसा हिली महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू

Advertisements

वृत्तसंस्था/ दुबई

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व ऑस्ट्रेलियन महिला संघाची यष्टिरक्षक ऍलीसा हिली यांची एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कारासाठी निवड केल्याचे आयसीसीने सोमवारी जाहीर केले.

दोन्ही खेळाडूंनी या महिन्यात झालेल्या सामन्यात शानदार प्रदर्शन केले होते. आझमने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. चाहते व आयसीसीच्या व्होटिंग अकादमीने त्याची निवड केली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱया वनडेत त्याने 82 चेंडूत 94 धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. त्याने त्याला 13 रेटिंग गुण मिळाले. त्याचे आता एकूण 865 रेटिंग गुण झाले असून आजवरचे त्याचे हे सर्वोच्च गुण आहेत. नंतर त्याने याच संघाविरुद्ध झालेल्या तिसऱया टी-20 सामन्यात 59 चेंडूत 122 धावा फटकावत पाकला विजय मिळवून देत मालिकाही जिंकून दिली होती.

महिलांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत सर्व प्रकारच्या गोलंदाजांवर ऍलीसा हिलीने वर्चस्व गाजविले. 3 वनडेत 51.66 च्या सरासरीने 98.72 च्या स्ट्राईकरेटने 155 धावा तिने फटकावल्या. त्या मालिकेत तिने ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक धावा जमविल्या आणि आपल्या संघाची विजयी घोडदौड 24 सामन्यापर्यंत वाढविली.

Related Stories

मुसळधार पावसामुळे तिसरा टी-20 सामना वाया

Patil_p

रोहितचा आत्मघाती फटका, भारत बॅकफूटवर

Patil_p

अस्ताना टेनिस स्पर्धेत जोकोविच विजेता

Patil_p

अमेरिकेचा नाकाशिमा विजेता

Patil_p

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेला ‘बढती’

Patil_p

न्यूझीलंडचा हॉलंडवर सलग दुसरा विजय

Patil_p
error: Content is protected !!