Tarun Bharat

बाबासाहेबांनी जीवन जगण्याचा अधिकार दिला : अशोकराव माने

प्रतिनिधी / शिरोळ

कित्येक वर्ष वंचित समाज गरिबीत अज्ञानात होता. या समाजाला कायदेशीर मार्गाने सन्मानाची वागणूक व जीवन जगण्याचा अधिकार दिला तो कोणीही विसरु शकणार नाहीत असे प्रतिपादन देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष जि. प. सदस्य डॉ. अशोकराव माने यांनी केले.

तमदलगे ता. शिरोळ येथील देश भक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीच्या कार्यस्थळावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ महापरिनिर्वाण दिनानिमित्त ते बोलत होते. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सूतगिरणीचे उपाध्यक्ष अनिल कांबळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन अशोकराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक जनरल मॅनेजर आर. जी. माने यांनी केले. या कार्यक्रमास संचालक बबन बनने, चिंतामणी निर्मळे, अमर धुमाळ, सुहास राजमाने, आशाताई निर्मळे, वसंतराव कांबळे, नानासाहेब राजमाने, विवेक कुलकर्णी यांच्यासह सर्व संचालक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार दिलीप काळे यांनी मानले.

Related Stories

कोल्हापूर : कोरोनाचे 24 बळी, 603 पॉझिटिव्ह

Archana Banage

वाकुर्डे-मुंबई एसटी पुन्हा सुरू करण्याची मागणी

Archana Banage

Kolhapur : सामाजिक बांधिलकी जपणारा उत्तम उपकार्यकारी अभियंता

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : अज्ञातांकडून ऊस वाहतूक ट्रॅक्टर चालकास बेदम मारहाण

Archana Banage

हुपरी येथे कोवीड केअर सेंटर उभारणार : खासदार धैर्यशील माने

Archana Banage

वनमंत्री संजय राठोड हाय हाय..!

Archana Banage
error: Content is protected !!