Tarun Bharat

बाबूल सुप्रियो यांची तृणमूलमध्ये एन्ट्री

कोलकाता / वृत्तसंस्था

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे माजी खासदार बाबुल सुप्रियो यांनी शनिवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यानंतर सुप्रियो यांनी अलीकडेच भाजपा सोडल्याचे जाहीर केले होते. त्यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणाही केली होती. त्यानंतर आता तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी बाबुल सुप्रियो यांना तृणमूलचे सदस्यत्व दिले आहे. यावेळी खासदार डेरेक ओब्रायन देखील उपस्थित होते. सुप्रियो यांच्या तृणमूल काँग्रेसमधील प्रवेशामुळे पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

सुप्रियो यांनी जुलै महिन्याच्या अखेरीस फेसबुकवरून राजकारण सोडण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर दुसऱयाच दिवशी त्यांनी आपण भाजपच्या बडय़ा नेत्यांना भेटलो होतो, पण त्यांनी त्यांच्या पुढील निर्णयाबाबत अद्याप काहीही सांगितले नाही असे म्हटले होते. मी भविष्यात काय करणार हे योग्य वेळ आल्यावरच सांगेन असेही सुप्रियो यांनी त्यावेळी म्हटले होते. गेल्या काही दिवसात सुप्रियो यांनी अनेक निकटवर्तियांच्या भेटीगाठी घेतल्या. यादरम्यान राजकारण सोडण्याचा माझा निर्णय चुकीचा आणि भावनिक होता, याची जाणीव मला करून देण्यात आली. त्यानंतर माझा निर्णय मी बदलला असून आता तृणमूलमधील प्रवेशाच्या माध्यमातून पुन्हा राजकीय सेवाकार्य सुरू करत असल्याचे सुप्रियो यांनी म्हटले आहे.

अलिकडेच झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी सुप्रियो यांना डच्चू देण्यात आला होता. मंत्रिपदावरून वगळल्यापासून ते राजकीय संन्यास घेऊ शकतात अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. राजकारणाऐवजी आता सामाजिक कार्यात सक्रिय होणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Related Stories

दिल्ली सरकारकडून ई- वाहन धोरण जाहीर; एवढी मिळणार ‘प्रोत्साहन राशी’

Tousif Mujawar

उमेदवारीत महिलांना 40 टक्के हिस्सेदारी

Patil_p

UP Elections 2022 : छाननी समितीमध्ये वर्षा गायकवाड

Patil_p

रेडमी के 50 आय बाजारात लाँच

Patil_p

मोदी सरकार लोकशाहीचे चार स्तंभ मोडीत काढण्याच्या तयारीत: संजय राऊत

Archana Banage

लडाखमध्ये जवानांसाठी उबदार सौरतंबू!

datta jadhav