Tarun Bharat

बामणोलीत गोठा जळून खाक

वार्ताहर/ ताम्हाने

संगमेश्वर तालुक्यातील बामणोली येथे लागलेल्या आगीत गोठा व वैरण जळून खाक झाली. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. याबाबत महसूल विभागाला कळवण्यात आले आहे. बामणोली गावातील मावळतवाडीतील गोविंद मांडवकर यांचा हा गोठा असून यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

            मांडवकर यांना रविवारी रात्री गोठय़ाला आग लागल्याचे दिसून आले. यावेळी त्यांनी गोठय़ाकडे धाव घेत पाणी मारण्याचे काम केले. काही वेळात आग आटोक्यात आणण्यात यश आले. तो पर्यंत बहुतांश गोठय़ासह वर्षभर पुरेल एवढी वैरण जळून खाक झाली. गोठा व वैरण मिळून सुमारे 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

            गतवर्षी मांडवकर यांच्या गोठय़ात बांधलेले दोन रेडे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. याबाबत देवरुख पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. मात्र पोलिसांना चोर पकडण्यात अपयश आले. यानंतर एक वर्षांनी त्यांच्याच गोठय़ाला आग लागली. हि आग कशाने लागली हे समजून आले नाही. सुदैवाने गोठय़ात गुरे नसल्याने जिवितहानी झाली नाही. ही घटना समताच गावचे सरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांनी भेट दिली. सोमवारी महसूल विभागाला माहिती देण्यात आली.

Related Stories

चिपळुणात महिलेवर कोयत्याने हल्ला

Patil_p

डॉ. श्रीपाद पाटील, विनायक पाटील आरोग्य दूत म्हणून सन्मान

Anuja Kudatarkar

अनधिकृत मायनिंगमागे ‘वरदहस्त’ कुणाचा?

NIKHIL_N

Photo: दोन वर्षानंतर दुमदुमला चांगभलंचा गजर…

Archana Banage

वाशिष्ठी पुलाचे काम दिवस-रात्र सुरू !

Archana Banage

देवगड हापूस मुंबई मार्केटमध्ये ‘गडगडला’

NIKHIL_N