Tarun Bharat

”बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी बबली निघाले”

Advertisements


मुंबई \ ऑनलाईन टीम

खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केलंय तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राणा पती-पत्नीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे.

काल विधिमंडळ अधिवेशनात आमदार रवी राणा यांनी अध्यक्षांसमोरचा राजदंड पळवला. यावरूनच रूपाली चाकणकर यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड… हे तर बंटी-बबली निघाले”, अशा शब्दात रूपाली चाकणकर यांनी नवनीत आणि रवी राणांवर हल्लाबोल केला आहे.


अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला होता. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं. तसंच राणा यांना दोन लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला होता.

Related Stories

दलित मतांवर राजकारण करणं सोपं पण निवडून येणं अवघड

datta jadhav

अक्षयकुमार एनसीबीच्या रडारवर

Patil_p

पुण्यात ढगफुटीसदृश पाऊस

datta jadhav

जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षण सोडत स्थगित

Archana Banage

ताशी 120 किमीने धडकणार निसर्ग वादळ

datta jadhav

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ८ बळी, ७० पॉझिटिव्ह

Archana Banage
error: Content is protected !!