Tarun Bharat

बायडेन प्रशासनात ‘महिला राज’

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी संभाव्य प्रशासनातील प्रमुख पदांवर महिलांची नियुक्ती करण्यास प्राधान्य दिले आहे. अमेरिकेतील स्थानिक माध्यमांनी यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. 

अमेरिकेत 20 जानेवारीला बायडेन यांचा शपथविधी होणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात आणि प्रशासनात महिलांना मोठ्या संधी देण्यात येणार आहे. कमला हॅरिस या उपाध्यक्ष असतील. भारतीय वंशाच्या नीरा टंडन यांची व्यवस्थापन आणि अर्थसंकल्प विभागाच्या संचालकपदी, अर्थतज्ज्ञ सिसिलिया रोस यांची आर्थिक सल्लागार परिषदेच्या प्रमुखपदी निवड होण्याची शक्यता आहे. 

व्हाईट हाऊसच्या जनसंपर्क संचालक म्हणून अनुभवी महिला अधिकारी केट बेडींगफिल्ड तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रवक्ता जेन साकी या बायडेन यांच्या प्रसिद्धी सचिव म्हणून काम पाहतील. CIA च्या संचालकपदी अल्वरिल हेन्स, गृहमंत्रिपदी लुलेन राईस, संरक्षण मंत्रिपदी मिशेल फ्लोरनोय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बायडेन यांच्या कारकिर्दीत व्हाईट हाऊसच्या कारभाराची धुरा सांभाळणाऱ्या तीन महिला अधिकारी ओबामा यांच्या काळातही व्हाईट हाऊसच्या अधिकारी होत्या.

Related Stories

दिल्लीत भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

datta jadhav

हरिद्वार धर्मसंसदेवरून भडकला पाकिस्तान

Patil_p

”अकाऊंट लॉक केले यामध्ये ट्विटरचा दोष आहेच मात्र यापेक्षा जास्त दोष भाजप आणि केंद्र सरकारचा”

Archana Banage

धक्कादायक! तीन दिवसाच्या बाळासह मातेला कोरोनाची लागण 

prashant_c

शिंदे गटाचे बंडखोर आमदार मुंबईकडे रवाना

Archana Banage

अमेरिकेत फायजरच्या कोरोना लसीला मंजुरी

Patil_p
error: Content is protected !!