Tarun Bharat

बायडेन, मॅक्रॉन यांच्याशी पंतप्रधान मोदींची गळाभेट

जी-20’ परिषदेदरम्यान मैत्रिपूर्ण संबंधांचे दर्शन

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

जी-20 परिषदेसाठी रोमला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुन्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. या छायाचित्रांमध्ये ते बायडेन आणि मॅक्रॉन यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. हे दोन्ही नेते चर्चा आणि भेटी-गाठीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खांद्यावर हात ठेवताना निदर्शनास आले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींची गठाभेट घेतली. एका छायाचित्रात बायडेन यांचा हात मोदींच्या खांद्यावर आहे. तर दुसऱया छायाचित्रात बायडेन आणि मोदी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. तसेच दोघेही हसताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत. एकंदर दोन्ही देशांतील नेत्यांचे संबंध मैत्रिपूर्ण असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. अमेरिका, फ्रान्ससह जगभरातील बलाढय़ देशांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध चांगले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन असोत किंवा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन असोत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोघांची भेट नजरेत भरणारी ठरली आहे.

Related Stories

तेलंगणात 4 दिवसांमध्ये दुसऱयांदा अतिवृष्टी

Patil_p

बेल्जियम : 25 जणांना अटक

Omkar B

गलवान खोऱ्यात मारले गेलेल्या सैन्यांची चीनकडून कबुली

datta jadhav

उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन ठणठणीत

datta jadhav

श्रीलंकेत चीनची मंदिर डिप्लोमसी

Patil_p

निदर्शने रोखताना जाळली ऐतिहासिक वास्तू

Patil_p