Tarun Bharat

बायडेन यांच्या शपथविधीला सशस्त्र आंदोलनाचा धोका

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या शपथविधीला डोनाल्ड ट्रम्प समर्थकांकडून सशस्त्र आंदोलन केले जाण्याची शक्यता एफबीआयने व्यक्त केली आहे.

संसदेच्या इमारतीबाहेर झालेल्या हिंसाचारानंतर ट्रम्प समर्थक पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून 16 ते 20 जानेवारीदरम्यान वॉशिंग्टन डीसीसह 50 राज्यात सशस्त्र आंदोलन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे वॉशिंग्टन स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना 24 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. 

तसेच वॉशिंग्टनमध्ये 15 हजार संरक्षक दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. शनिवारपर्यंत वॉशिंग्टनमध्ये जवळपास 10 हजार तुकड्या उपस्थित असतील, असे नॅशनल गार्ड ब्युरोचे प्रमुख जनरल डॅनियल यांनी म्हटले आहे.

Related Stories

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे देणार राजीनामा

datta jadhav

नेपाळ : अयोध्यापुरी प्रभू रामाचे जन्मस्थान; भव्य राममंदिर उभारणार

datta jadhav

युद्धाचा भडका

Amit Kulkarni

कोरोनाची तेल बाजारालाही झळ

prashant_c

कोविड-19 वरील नव्या औषधाची तयारी

Patil_p

‘फडणवीस जनतेची दिशाभूल करत आहेत’

Archana Banage