Tarun Bharat

बायडेन यांनी केली मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांची निवड

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची निवड केली आहे. देशांतर्गत गुप्तचर विभागाची जबाबदारी त्यांनी ‘सीआयए’च्या माजी संचालक आर्विल हेन्स यांच्यावर सोपवली असून, ही जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या पहिल्या महिला असणार आहेत. 

अमेरिकेचे मुख्य राजदूत जॉन केरी यांच्याकडे हवामान विभागाची तर ज्येष्ठ वकील अलेजांड्रो मायोर्कस यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी असणार आहे. दीर्घकाळ परराष्ट्र धोरण सल्लागार म्हणून काम केलेले अँटनी ब्लिंकेन हेपरराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सांभाळतील.

व्हाईट हाऊस’च्या सुरक्षा सल्लागारपदी जेक सालीवन यांची तर संयुक्त राष्टातील अमेरिकेच्या प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड यांची निवड करण्यात आली आहे.

Related Stories

चार दिवस दिल्लीत थांबूनही अमित शहांची भेट नाही ;चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

Archana Banage

केसीआर आणि प्रशांत किशोर यांची दुसऱ्या दिवशीही चर्चा सुरूच

Archana Banage

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर फडणवीस म्हणाले, “मला खात्री…”

Archana Banage

कोल्हापूर – सांगली पूरग्रस्त उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांची बैठक

Archana Banage

कोलंबियात कोरोनाबाधितांची संख्या 7.77 लाखांवर

datta jadhav

नो कास्ट,नो रीलीजन प्रमाणपत्र मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली महिला ठरली प्रितिशा शाह

Archana Banage