Tarun Bharat

बायोमेट्रीक सर्व्हेला झाला प्रारंभ

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहरातील हॉकर्स धारकांचा बायोमेट्रिक सर्व्हे आजपासून प्रारंभ झाला आहे. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार हा सर्व्हे सुरू असून शहरातील हॉकर्स धारकांनी मोबाईलला आधार लिंक करून घ्यावीत, असे आवाहन हॉकर्स संघटनेचे सातारा शहर अध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.

 सातारा शहरात फेरीवाले हॉकर्स यांचा बायोमेट्रिक सर्व्हे यापूर्वी सुरू होता. मात्र लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर हा सर्व्हे थांबवण्यात आला होता. पुन्हा नव्याने आज पासून बायोमेट्रिक सर्व्हेला प्रारंभ झाला आहे. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सूचनेनुसार पालिकेचे अधिकारी दिवेकर श्रीमती साळुंखे, श्रीमती जोशी, सर्व्हे अधिकारी जोशी हे सर्व करत आहेत. या सर्व्हेच्या अनुषंगाने सातारा जिल्हा हॉकर्स संघटनेचे जिल्हाध्यक्ष सादिकभाई पैलवान, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप माने, जिल्हा सरचिटणीस श्याम चिंचणे, मार्गदर्शक राम हादगे, सागर भोगावकर, दीपक शिंदे, शहराध्यक्ष संजय पवार यांनी शहरातील सर्व हॉकर्स धारकांनी या बायोमेट्रिक सर्व्हेला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Related Stories

संचारबंदीची पायमल्ली करणाऱ्या दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Archana Banage

शिवरायांचा इतिहास गीत ध्वनीमुद्रणातून समाजापुढे यावा : खासदार संभाजीराजे

Archana Banage

आता सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पाहा Live

Archana Banage

सातारा शहरातल्या बाधितांना समजेना कुठे बाधा झाली?

Patil_p

सद्भावना दौडचे कराडमध्ये स्वागत

Amit Kulkarni

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे –

Patil_p