वाळपई / प्रतिनिधी
गुळेली पंचायत क्षेतातील पैकुळ येथे एका युवतीवर गव्याने हल्ला करून तिचे निधन झाल्याची घटना ताजी असतानाच खोतोडा पंचायत क्षेत्रातील बाराजण याठिकाणी गोपाळ मोर्लेकर (35) यांच्यावर हल्ला करून त्याला जखमी करण्याचे प्रकार घडला आहे. यामुळे सदर भागांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून यावर वनखात्याच्या यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्था?नी केली आहे. सदर घटना दुपारी 4.30 वा. सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गोपाळ हा खडकी भागातून बाराजण येथे जात होता. यावेळी अचानकपणे रस्त्यावर आलेल्या गव्याने त्याच्यावर हल्ला केला. यामुळेच गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ वाळपई सामाजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आलेली आहे.
गेल्या काही दिवसापासून सदर गवारेडा या भागांमध्ये दहशत माजवीत आहे. याबाबतच्या तक्रारी वनखात्याचे यंत्रणेला केलेले आहेत. मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्याचे ग्रामस्था?नी स्पष्ट केलेले आहे. आज रविवारी सदर गवा लोकवस्तीच्या नजीक आला होता. त्यामुळे ग्रामस्था?मध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या गाव्ययाचा बंदोबस्त ताबडतोब वनखात्याने करावा अशा प्रकारची मागणी ग्रामस्था?नी केली आहे.