Tarun Bharat

बारामतीत बनावट ‘रेमडेसिवीर’चे रॅकेट उघडकीस

बारामती : कोरोना संक्रमित रुग्णांना संजीवनी ठरत असणाऱ्या ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामॉल लिक्विड भरुन त्याची 35 हजार रुपयांना विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत उघडकीस आला आहे. त्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले आहे.  

दिलीप ज्ञानदेव गायकवाड (वय 35, रा. काटेवाडी, ता. बारामती), प्रशांत सिध्देश्वर घरत (वय 23, रा. भवानीनगर, ता. इंदापूर), संदिप संजय गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती), शंकर दादा भिसे (वय 22,रा. काटेवाडी, ता. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कायदा, औषधे व सौदर्यप्रसाधने कायदा, औषध किंमत नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनचे निरिक्षक विजय नगरे यांनी फिर्याद दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीतील एका कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकाला रेमडेसिवीरची तातडीची गरज असल्याने त्याने या टोळीतील एकाशी संपर्क साधला. तो बारामतीतील एका कोविड सेंटरमध्ये काम करतो. त्याच्याकडे इंजेक्शन असल्याची माहिती गरजूला मिळाली होती. त्यानुसार इंजेक्शन देणाऱयाने त्याला शहरातील फलटण चौकात येण्यास सांगितले. एका इंजेक्शनचे 35 हजार असे दोन इंजेक्शनचे 70 हजार द्यावे लागतील, अशी मागणी केली. दरम्यान, पोलिसांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी वाहनांसह या टोळीतील काहींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. सेंटरमधील रिकाम्या झालेल्या रेमडेसीवीरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटामॉल लिक्विड भरत ते फेवीक्विकने व्यवस्थित पॅक करुन हे बनावट औषध विकले जात होते.

Related Stories

अंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुला

datta jadhav

प्रवासी घटल्याने महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द

Archana Banage

‘शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करा’

Archana Banage

तब्बल दिड वर्षाने दुकाने 10 पर्यंत खुली

Patil_p

जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

datta jadhav

कराड तालुक्यातील चौघे कोरोनामुक्त

Archana Banage
error: Content is protected !!