Tarun Bharat

बारावीचा निकाल आज, ‘या’ संकेतस्थळावर पहा निकाल

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल राज्य मंडळातर्फे मंगळवारी (३ ऑगस्ट) दुपारी चार वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयनिहाय गुण असलेल्या निकालाची प्रत डाऊनलोड करून घेता येईल. दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून राज्य शासनाने बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सोमवारी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने राज्यसरकारला ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते. पण राज्य मंडळाला या आदेशाचे पालन करता आले नाही. बारावीच्या निकालावर विविध पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असल्याने राज्य मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा निकाल खालील संकेतस्थळांद्वारे पाहता येणार

https://hscresult.net

11admission.org.in

https://msbshse.co.in

maharesult.nic.in

hscresult.mkcl.org

Related Stories

म्हशीने घरासमोर घाण केल्याने दोन कुटुंबात हाणामारी, तिघांना अटक

datta jadhav

तहसिलदार कार्यालयाने घेतला मोकळा श्वास

Patil_p

संजय धुमाळांवर विनयभंगाचा गुन्हा

Patil_p

“…तर मी स्वत: लोकांसमोर फासावर जाईन”

Archana Banage

उत्पल पर्रिकरांच्याच बाबतीत घराणेशाही कशी आडवी आली ? – संजय राऊत

Abhijeet Khandekar

लोकपाल सदस्य, माजी न्यायाधीश ए. के. त्रिपाठी यांचे कोरोनामुळे निधन

Tousif Mujawar
error: Content is protected !!