Tarun Bharat

बारावीचा निकाल २०जुलै रोजी

प्रतिनिधी/ बेंगळूर

परीक्षेशिवाय बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता या विद्यार्थ्यांचा निकाल 20 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोरोना परिस्थितीमुळे राज्य सरकारने बारावीतील प्रेशर्स आणि रिपिटर्स विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला असून त्यांना अकरावी आणि दहावी वार्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. निकालपत्रक तयार करण्यासाठी निकषही ठरविले होते. आता पदवीपूर्व शिक्षण खात्याने निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून मंगळवार दि. 20 जुलै रोजी तो जाहीर केला जाणार आहे. ग्रेडऐवजी दरवर्षीप्रमाणे गुणांच्या स्वरुपात निकाल दिला जाणार आहे, अशी माहिती पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालक स्नेहल यांनी दिला आहे.

खात्याच्या http://pue.kar.nic.in या बेवसाईटवर निकाल उपलब्ध केला जाणार आहे. दरवर्षी विद्यार्थी परीक्षेचा रजिस्टर नंबर नमूद करून आपला निकाल पहात होते. मात्र यावेळी परीक्षेशिवाय निकाल जाहीर करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांजवळ रजिस्टर नंबर असणार नाही. त्यामुळे शिक्षण खात्याने यंदा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्रपणे नोंदणी क्रमांक तयार केला असून तो शुक्रवारपासूनच खात्याच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला आहे, अशी माहितीही स्नेहल यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी हा क्रमांक मिळविण्यासाठी http://pue.kar.nic.in या वेबसाईवर जाऊन Know my number या लिंकवर क्लिक करावे. तेथे जिल्हय़ाचे नाव आणि कॉलेजचे नाव निवडल्यानंतर विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक मिळेल. हा क्रमांक निकाल जाहीर झाल्यानंतर वेबसाईटवर नमूद करून निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे आणि महाविद्यालयात निकाल पाहता येईल.

Related Stories

भारत-अमेरिका यांच्यात संरक्षण माहिती आदानप्रदान करार

Patil_p

दिल्ली उपराज्यपालांचे अधिकार वाढणार

Patil_p

आता फक्त राष्ट्र…नो महाराष्ट्र; राज्याच्या राजकारणात रस नसल्याचे विनोद तावडेंचे स्पष्टीकरण

Abhijeet Khandekar

दिल्लीत दिवसभरात 146 कोरोनाबाधित

Tousif Mujawar

उत्तराखंड : भाजप आमदार विनोद चमोली कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

‘पेगॅसस’ चौकशीसाठी तज्ञांची समिती नेमणार

Amit Kulkarni