Tarun Bharat

बारावीच्या निकालासाठीचे निकष २ आठवड्यामध्ये सांगा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

Advertisements


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

केंद्र सरकारने बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु बारावीच्या परीक्षांचा निकाल कोणत्या निकषांच्या आधारावर लावण्यात येणार आहे. याची माहिती सांगा, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले आहे. येत्या २ आठवड्यांत अहवाल सादर करा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी याचिका अॅड.ममता शर्मा यांनी दाखल केली होती या ही याचिका रद्द करण्याची मागणी करण्यात आली असता केंद्र सरकारने निकालाचे निकष सांगितल्यावर याचिका रद्द करु असे म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ममता शर्मा यांची याचिका रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडून अॅटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांनी केली. ममता शर्मा यांनी बारावी परीक्षा रद्द करण्यासंबंधी मागणी केली होती ही मागणी मंजूर झाल्यामुळे याचिका रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारने केली होती. परंतु बारावीच्या परीक्षांचे निकाल कोणत्या निकषांच्या आधारे लावणार असा सवाल केला यावर केंद्र सरकारने निकाल कसा लावायचा हे सीबीएसई ठरवेल असे सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान केंद्र सरकारकडे उत्तर मागितल्यावर आयसीएसईच्या विकलांनी ४ आठवडे वेळ मागितला. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि आयसीएसईची बाजूचे मत जाणून घेतल्यानंतर २ आठवड्यांचा वेळ दिला आहे. येत्या २ आठवड्यांमध्ये निकाल कसा लावणार याबबत सांगा, हवं तर दिवसरात्र चर्चा करा असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माहेश्वरी यांनी म्हटले आहे.

Related Stories

राजस्थान काँगेसमध्ये गटबाजी सुरूच

Patil_p

ग्रामीण भारत कर्जबाजारी होतोय; 50 टक्क्यांहून अधिक कृषी कुटुंबांवर कर्जाचा बोजा

Archana Banage

कोरोना महामारीतही चीनने रचला कट!

Patil_p

दसरा मेळाव्यासाठी शिवसेना हायकोर्टात

datta jadhav

२९ जून सांख्यिकी दिवस म्हणून साजरा

Nilkanth Sonar

भारतीय लसीचा फॉर्म्युला चोरण्याचा चीनचा प्रयत्न

datta jadhav
error: Content is protected !!