Tarun Bharat

बारावी परीक्षेत यंदाही मुलींचा ‘डंका’

एकूण 92.66 टक्के निकाल , 94.58 टक्के मुली तर 90.66 टक्के मुले उत्तीर्ण

प्रतिनिधी/ पर्वरी

Advertisements

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या मार्च 2022  बारावीच्या परीक्षेचा निकाल 92.66 टक्के लागला असून 18112 पैकी 16783 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही उत्तीर्ण टक्केवारीत मुलींनी बाजी मारली आहे. मुलींची 94.58 टक्के तर मुलांची 90.66 टक्के इतकी आहे.

गोवा माध्यमिक व उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटय़े यांनी शनिवारी येथील शिक्षण संचालनालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर केला. यावेळी सचिव गेराल्डिना मेंडीस, सहसचिव शीतल कदम, भारत चोपडे उपस्थित होते.

यावषी या परीक्षेत 18112 इतके विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी 16783   विद्यार्थी उर्त्तीण झाले. 105 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. 8861 मुलांपैकी 8033 जण उत्तीर्ण झाले. त्यांची टक्केवारी 90.66 इतकी आहे. तर 9251 मुलींपैकी 8750 मुली उत्तीर्ण झाल्या. त्यांची टक्केवारी इतकी आहे.

यंदा तिसवाडी तालुक्मयाचा सर्वाधिक 95.92 टक्के तर केपे तालुक्मयाचा सर्वात कमी 86.23 टक्के इतका निकाल लागला आहे. मागील वषी 99.40 टक्के निकाल लागला होता. यंदा कोरोना संकटामुळे मंडळाने प्रथमच बारावीची परीक्षा डिसेंबर 21 आणि एप्रिल 22 अशा दोन सत्रांमध्ये घेतली होती. यावषी अभ्यासक्रमातील दोन्ही सत्राचे पन्नास टक्के आणि अंतर्गत मूल्यांकनाचे गुण 20 टक्के असे  एकत्रित करून गुणपत्रक तयार करण्यात आले, असे त्यांनी स्पष्ट केले.

कॉपी प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या पुरवणी परीक्षेसाठी समितीद्वारे निर्णय

यंदा पहिल्यांदाच कॉपी करताना चार विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे. चार पैकी दोन विद्यार्थ्यांनी गंभीर गुन्हा केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून रु. 1000 दंड आकरण्यात आला आहे. तसेच त्यांना त्या विषयात शून्य गुण दिला आहे. त्यांना पुरवणी परीक्षा देण्यास मिळणार की नाही हे नंतर एक समिती स्थापन करून त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, असे गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेटय़े यांनी स्पष्ट केले.

.

108 दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी 94 उत्तीर्ण

यंदा 21 विद्यार्थी खासगी बसले होते. त्यातील 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 6 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. आयटीआय 26 विद्यार्थी बसले होते, त्यातील 18 विद्यार्थी पास झाले तर 7 विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. 30 नापास विद्यार्थी बसले होते त्यापैकी 19 उत्तीर्ण झाले आहेत. 5 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. 108 दिव्यांग विद्यार्थी  बसले होते. त्यापैकी 94  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एनएसक्मयू विषय घेऊन बसलेल्या 1166 विद्यार्थ्यांपैकी 1099 उत्तीर्ण झाले आहेत.  यंदा सर्वसामान्य गटातील 93.03 टक्के, मागास वर्गातील 92.35 टक्के, अनुसूचित जातीतील 90.53 टक्के तर अनुसूचित जमातीतील 91.26 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. खेळात प्राविण्य मिळविलेल्या 349 विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात त्यापैकी 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कला शाखेचा 95.68 टक्के निकाल

कला शाखेचा 95.68 टक्के निकाल लागला असून एकूण 4700 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 4497 उत्तीर्ण झाले आहेत. 178 जण अनुत्तीर्ण झाले आहेत तर 4 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे.

वाणिज्य शाखेचा 95.71 टक्के निकाल

वाणिज्य शाखेचा 95.71  टक्के निकाल लागला आहे. एकूण 5484  विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 5249 उत्तीर्ण झाले तर 204 जण अनुत्तीर्ण झाले आहेत. 40 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला आहे.

विज्ञान शाखेचा 93.95 टक्के निकाल

विज्ञान शाखेचा 93.95 टक्के निकाल लागला आहे. एकूण 5062 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील 4756 उत्तीर्ण झाले 296 जण अनुत्तीर्ण झाले तर एका विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे.

व्यावसायिक शाखेचा 79.04 टक्के निकाल

व्यावसायिक शाखेचा 79.04  टक्के निकाल लागला आहे. 2866 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 2281 उत्तीर्ण झाले तर 546 अनुतीर्ण झाले आहेत तर 39 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. )

गेल्या पाच वर्षांचा निकाल 2017-88.78 टक्के, 2018-85.84 टक्के,   2019- 89.59 टक्के, 2020 – 89.27 टक्के, 2021 -99.40 टक्के  असा आहे.

पुरवणी परीक्षा 24 जून 2022 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष भगीरथ शेटये यांनी दिली आहे.

Related Stories

फोंडा शहरातील सार्वजनिक गणपतींचे दीड दिवसांत विसर्जन

Patil_p

शांतादुर्गा वेर्डेकरीण संस्थानात नवीन महाब्रह्मरथाची भर

Amit Kulkarni

पर्यटन धोरण त्वरित मागे घ्यावे गोवा फॉरवर्डची मागणी

Omkar B

कोळसा वाहतुक व रेल मार्ग दुपदरीकरणाविरोधात कासावलीत रॅली

Omkar B

पोलिसांची 24 तास ऑन डय़ुटी

tarunbharat

पाच हजार कोटीचा प्रकल्प काढावा लागणार मोडीत

Patil_p
error: Content is protected !!