Tarun Bharat

बारावी विद्यार्थ्यांना वास्तव्यास असलेल्या भागात इंग्रजीचा पेपर देण्याची व्यवस्था

प्रतिनिधी / बेंगळूर

लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडलेला बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर घेण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. विद्यार्थी ज्या जिल्हय़ात आहेत तेथूनच त्यांना परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षेबाबत गोंधळात असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपरही होऊ शकला नव्हता. लॉकडाऊन पूर्णपणे शिथिल होण्याची चिन्हे अद्याप दिसून आलेली नाहीत. त्यामुळे पदवीपूर्व शिक्षण खात्याने इंग्रजीचा पेपर जून महिन्यात घेण्याचा विचार चालविला आहे. लॉकडाऊनमुळे वसतीगृहांमधील विद्यार्थी गावी गेल्यामुळे त्यांना एका पेपरसाठी पुन्हा परीक्षा केंद्रांपर्यंत येणे कठीण आहे. त्यामुळे खात्याने विद्यार्थ्यांना ते इच्छित असलेल्या जिल्हय़ात किंवा ते राहात असलेल्या जिल्हय़ातूनच परीक्षा देण्याची व्यवस्था केली आहे. याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आला असून सध्या वास्तव्यास असलेल्या जिल्हय़ातूनच परीक्षा देण्यासाठी इच्छुक असणाऱया विद्यार्थ्यांना आपली माहिती ई-मेलवर पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे.

महाविद्यालयाचा संकेत क्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, परीक्षार्थी क्रमांक, बारावीचा रजिस्टर नंबर, विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक, सध्या वास्तव्य असलेला पत्ता, परीक्षा केंद्राचा कोड, वास्तव्यास असणाऱया जिल्हय़ातील ज्या परीक्षा केंद्रात पेपर देण्याची इच्छा आहे त्या परीक्षा केंद्राची माहिती dtt.pue@gmail.com या संकेतस्थळावर पाठवून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

कारलगा हायस्कूलमध्ये राष्ट्रीय पोषण अभियान उत्साहात

Amit Kulkarni

ऍक्सेलसेन, यामागुची बॅडमिंटन विजेते

Patil_p

बढतीसाठी ग्रा.पं. कर्मचार्‍यांची जि.पं.समोर निदर्शने

mithun mane

अभक्त वर्णन

Patil_p

9,136.89 कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरण

Patil_p

खर्गे आहे त्या परिस्थितीचे नेर्तृत्व करतात माझी उमेदवारी नवीन बदलासाठी- खास. शशी थरूर

Abhijeet Khandekar