Tarun Bharat

बार्टी, अझारेन्का, बेडोसा, स्विटोलिना, नदाल तिसऱया फेरीत

Advertisements

व्हेरेव्ह, सित्सिपस, शॅपोव्हॅलोव्ह, बेरेटिनी यांचीही आगेकूच, केर्बरचे आव्हान समाप्त

वृत्तसंस्था/ मेलबर्न

अग्रमानांकित ऍश्ले बार्टी, पॉला बेडोसा, कॅमिला जॉर्जी, काया कॅनेपी, व्हिक्टोरिया अझारेन्का, एलिना स्विटोलिना, राफेल नदाल, अलेक्झांडर व्हेरेव्ह, मॅटेव बेरेटिनी, कार्लोस अल्काराझ, डेनिस शॅपोव्हॅलोव्ह, स्टेफानोस सित्सिपस यांनी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला. माजी विजेत्या जर्मनीच्या अँजेलिक केर्बरचे आव्हान मात्र समाप्त झाले.

ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने इटलीच्या लुसिया ब्राँझेटीचा 6-1, 6-1 असा धुव्वा उडविताना केवळ दोन गेम्स गमविले. तिने 58 मिनिटात हा सामना संपवताना 8 बिनतोड सर्व्हिस केल्या. तिची पुढील लढत इटलीच्याच कॅमिला जॉर्जीशी होईल. जॉर्जीने तेरेसा मार्टिनकोव्हाचा 6-2, 7-6 (7-2) असा पराभव केला. आठव्या मानांकित स्पेनच्या पॉला बेडोसाने इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनचा 6-0, 6-3 असा फडशा पाडला. 24 व्या मानांकित अझारेन्काने 2012 व 2013 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तिने जिल टीचमनला 6-1, 6-2 असे नमवित अकराव्या वेळी या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. तिची पुढील लढत स्विटोलिनाशी होईल. फ्रान्सच्या हार्मनी टॅनने तिसऱया सेटमधून माघार घेतल्याने स्विटोलिनाला विजयी घोषित करण्यात आले. यावेळी स्विटोलिना 6-3, 5-7, 5-1 अशी विजयासमीप होती.

नदाल, बेरेटिनी, अल्काराझची आगेकूच

पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालने तिसरी फेरी गाठताना जर्मनीच्या यानिक हन्फमनचा 6-2, 6-3, 6-4 असा पावणेतीन तासात पराभव केला. नदालने 2009 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्याची लढत ऑलिम्पिक रौप्यविजेता कॅरेन खचानोव्ह किंवा बेंजामिन बॉन्झी यापैकी एकाशी होईल. सातव्या मानांकित मॅटेव बेरेटिनीने अमेरिकेच्या स्टीफन कोझलोव्हवर 6-1, 4-6, 6-4, 6-1 अशी मात करीत दुसऱयांदा या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. तिसऱया फेरीत त्याचा मुकाबला कार्लोस अल्काराझशी होईल अल्काराझने डुसान लॅजोव्हिकचा 6-2, 6-1, 7-5 असा फडशा पाडला. कॅनडाच्या शॅपोव्हॅलोव्हला मात्र विजयासाठी पाच सेट्समध्ये संघर्ष करावा लागला. त्याने दक्षिण कोरियाच्या सून वू क्वॉनवर 7-6 (8-6), 6-7 (3-7), 6-7 (6-8), 7-5, 6-2 अशी मात केली. साडेचार तास ही लढत रंगली होती. जर्मनीच्या तिसऱया मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हनेही तिसरी फेरी गाठली असून त्याने जॉन मिलमनचा 6-4, 6-4, 6-0 असा पराभव केला. मॉल्डोव्हाच्या रॅडू अल्बोटशी त्याची पुढील लढत होईल. मागील वर्षी झालेल्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळविणाऱया व्हेरेव्हने तुरिनमध्ये झालेल्या एटीपी फायनल्समध्ये मेदवेदेव्हला हरविले हेते. अन्य सामन्यात ग्रीसच्या सित्सिपसने स्वीडनच्या मायकेल वायमरवर 6-2, 6-4, 6-3 अशी मात केली तर नवव्या मानांकित फेलिक्स ऑगर ऍलियासिमेने एमिल रुसुव्होरीवर 6-4, 0-6, 3-6, 6-3, 6-4 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.

बॉक्स   (फोटो -19 एसपीओ 07-बोपण्णा-व्हॅसेलिन)

बोपण्णा-व्हॅसेलिन, अँजेलिक केर्बर यांचे आव्हान समाप्त महिला एकेरीत माजी जागतिक 15 वी मानांकित काया कॅनेपीने 2016 ची चॅम्पियन अँजेलिक केर्बरचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणले. सव्वातास ही लढत रंगली होती. पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा व फ्रान्सचा एदुआर्द रॉजेर व्हॅसेलिन यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या फिलिपिन्सचा ट्रीट हय़ू व इंडोनेशियाचा ख्रिस्तोफर रुंगकट यांच्याकडून त्यांना 3-6, 7-6 (7-2), 6-2 असा पराभव स्वीकारावा लागला. एक तास 48 मिनिटे ही लढत रंगली होती. बोपण्णा-व्हॅसेलिन यांनी पहिला सेट झटपट जिंकून आघाडी घेतली. पण दुसऱया सेटमध्ये प्रतिस्पर्धी जोडीने कडवा प्रतिकार करीत टायब्रेकरमध्ये गेलेला सेट जिंकून बरोबरी साधली. निर्णायक सेटमध्येही त्यांनी जोम कायम ठेवत बोपण्णा-व्हॅसेलिन यांचे आ

Related Stories

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डीन जोन्स यांचे मुंबईत निधन

Rohan_P

रोनाल्डोचा वाढदिवस अन् कोल्हापूरी चाहत्यांची सामाजिक बांधिलकी

Abhijeet Shinde

लक्ष्य सेन दुसऱया फेरीत

Patil_p

स्पेनचा अँडय़ूजेर उपांत्य फेरीत

Patil_p

दुखापतग्रस्त टॉम करण उर्वरित बिग बॅशमधून बाहेर

Patil_p

पहिल्या डावाअखेर न्यूझीलंड 85 धावांनी आघाडीवर

Patil_p
error: Content is protected !!