Tarun Bharat

बार्शीतील कोरफळेत एकाचा अनैतिक संबंधातून खून

प्रतिनिधी / बार्शी
बार्शी तालुक्यातील कोरफळे या गावांमध्ये शिवाजी जगन्नाथ बाबर यांचा झोपेत असताना डोक्यात दगड घालून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल झाली असून मयताचा मुलगा नित्यानंद बाबर यांनी फिर्याद दाखल केली आहे . हा खून आज सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजी बाबर आपल्या घरासमोर झोपले असता त्यांच्या डोक्यात दगड घालून कोरफळे गावचे रहिवासी अमीन इसाक आतार यांनी केला असल्याचे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सविस्तर बातमी अशी की , बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे दाखल झालेल्या फिर्यादीनुसार शिवाजी बाबर आणि खून केलेला आरोपी अमीन इसाक आतार या गावी एकमेकांच्या घरासमोर राहत असून शिवाजी बाबर आणि आरोपी अमीन आतार यांची आत्या मीना आतार यांचे अनेक वर्षापासून अनैतिक संबंध होते. याचं अनैतिक संबंधातून आमीन या आरोपीने आपली आत्या मीना आतार हीचा तीन वर्षाखालील खून केला होता. मीना आतार यांच्या खुनामध्ये सदर आरोपी एक वर्ष अटकेत होता तो दोन वर्षापूर्वी सुटून आल्याने त्याने अनेक वेळा शिवाजी बाबर यांना तुमचाही खून करतो अशा धमक्या दिल्या होत्या. तसेच मीना आतार यांचे शिवाजी बाबर यांच्या सोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे जमीन विकली असल्याचे ही तो आरोपी सांगत होता. याविषयी बार्शी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार आरोपी अमीन आतार याने सकाळी साडेसहाच्या सुमारास शिवाजी बाबर यांच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत बार्शी तालुका ठाणे येथे भारतीय दंड विधान 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून आरोपी अमीन इसाक आतार यास अटक केली आहे.

Related Stories

नेसरी: माहिती लपवल्याबद्दल चौघांवर गुन्हा दाखल

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 5,011 नवे कोरोना रुग्ण; 100 मृत्यू

Tousif Mujawar

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अटक

Archana Banage

जयसिंगपुरातील माने केअर सेंटरमधील डायलिसिस टेक्निशियनला जीवे मारण्याची धमकी

Archana Banage

मान्सूनची दमदार एन्ट्री

Patil_p

राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी रद्द

datta jadhav