बार्शी / प्रतिनिधी
तालुक्यातील खांडवी येथे टिप्परच्या हायड्रॉलिक जॅक मध्ये अडकून चालक अशोक पांडुरंग कोळी यांचा जागीच मृत्यू झाला असून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात यांची नोंद झाली आहे. अशोक पांडुरंग कोळी (वय 34) राहणार तडवळे, तालुका माढा असे मृत चालकाचे नाव आहे. टिप्पर चे जॅक खाली येईना म्हणून ड्रायव्हर अशोक कोळी पाहणी करण्यास गेला असता अचानक जॅक खाली येवून ते जॅक मध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महेश डोंगरे, विजय घोगरे, धिमधीमे साहेब, पठाण साहेब आधी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पुढील तपास पोलीस हवालदार जनार्धन शिरसट करत आहेत


next post