Tarun Bharat

बार्शीतील विवाहितेचा प्रेमसंबंधातून खून

Advertisements

प्रतिनिधी / बार्शी

बार्शी येथील उपळाई रोड येथे राहणाऱ्या रूकसार अलीम मुलाणी वय-२८ वर्षे हिचा रिहान उर्फ ख्वाजा मुलाणी वय-२५ वर्षे याने खून केल्याची फिर्याद जुबेदा म. हुसेन खान वय-६० वर्षे यांनी बार्शी पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे.

अधिक माहिती अशी की रूकसार मुलाणी हिचे मागील दहा वर्षापुर्वी बारंगुळे प्लॉट येथील अलीम नजीर मुलाणी याच्यासोबत लग्न झाले होते. त्यापासून रुकसारला अब्बास मुलाणी वय-१० वर्षे, उमेरा मुलाणी वय-८ वर्षे दोन मूली झाली होती. फिर्यादीप्रमाणे अलीम मुलाणी हा कामधंदा न करता दारुचे व्यसन करीत होता व बायकोवर संशय घेत होता त्यामुळे ती माहेरी रहायला आली होती. त्यानंतर तीन महिन्यापूर्वी सांगोला येथे हॉटेलमध्ये धूणे-भांड्याचे काम करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिचे रिहानशी प्रेमसंबंध जुळले. रिहानने ट्रक ड्रायव्हर असल्याचे सांगून दोन्ही मुलांना संभाळायला तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर ते दोघेही लग्न करून बार्शीतील शंभर फूटी रोड उपळाई रोड येथे राहण्यासाठी आले. त्यानंतर दोन्ही मुलांना महाबळेश्वर येथील मदरशामध्ये टाकण्यात आले. दि.८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जेवणाच्या कारणावरून वाद झाले. त्यावेळी रुकसारने आपल्या आईला रिहान हा फोन वापरु देत नाही व संशय घेत असल्याचे सांगितले.

त्यानंतर आईने वाद मिटवून त्यांच्या गाडेगाव रोड येथील घरी गेल्या. त्यानंतर त्या दि.९ एप्रिल रोजी सायंकाळी ७:३० वाजता मुलगी रूकसारकडे गेल्या त्यावेळी बाहेरून दाराला कडी लावल्याचे दिसले. कडी उघडून आत गेल्यानंतर किचनमध्ये त्यांची मुलगी पडलेली दिसली. तिच्या नाका तोंडातून रक्त येत होते. शरीराची काहीच हालचाल होत नव्हती. नातेवाईकांना बोलवून घेऊन सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. त्यावेळी रूकसार ही मयत झाली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर फिर्यादीने रिहान उर्फ ख्वाजा मुलाणी याच्या विरुद्ध जीवे ठार मारल्याची तक्रार देण्यात आली. पुढील तपास एपीआय उदार हे करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : कोरोना नसेल तरच जिल्ह्यात प्रवेशाचा आदेश रद्द : जिल्हाधिकारी दौलत देसाई

Abhijeet Shinde

सोलापूर : अंजुमन-ए-इस्लाम संस्थेस ‘सर सय्यद एक्सलेन्स ॲवॉर्ड’ने सन्मानित

Abhijeet Shinde

IPL 2020 : चेन्नई सुपर किंग्जला धक्का; ‘या’ खेळाडूची माघार

Rohan_P

नवाब मलिकांना धमकीचा फोन

datta jadhav

शेती, घराच्या वाटणीसाठी सख्या भावात वाद; शिक्षक भावाला जबर मारहाण

Abhijeet Shinde

सोलापूर : बार्शी शहरासाठी राबवणार ‘वैराग पॅटर्न’ : प्रांताधिकारी निकम

Abhijeet Shinde
error: Content is protected !!