Tarun Bharat

बार्शीत जिल्हाधिकारी यांचा घरपोच गॅसचा आदेश वाऱ्यावर

लहान मुलांना घेऊन नागरिक पडताहेत घराबाहेर

बार्शी / प्रतिनिधी


बार्शी शहरांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार जास्त वाढल्याने बार्शी शहर पुन्हा एकदा कडक संचार बंदीच्या अवस्थेमध्ये गेले आहे. प्रशासकीय यंत्रणेचे सर्व विभाग कोरोना विषाणूचा प्रसार कमी व्हावा या प्रयत्नांमध्ये आहेत. नागरिकांनी पाळलेली संचार बंदी भीतीपोटी असली तरी अनेक नागरिक फक्त आपल्या रोजच्या गरजांसाठी बाहेर पडत आहेत. संचारबंदी लागू होत असताना जिल्हाधिकारी यांनी स्वयंस्पष्ट आदेश सर्व विभागांना दिले होते, त्याप्रमाणे सर्व विभाग आणि सेवा देणाऱ्या संस्था काम करत असताना सामान्य नागरिकाच्या स्वयंपाक घरातील घरगुती वापरायचा गॅस सिलेंडर ही तशी निकराची गरज पुरवणाऱ्या सेवा संस्था मात्र या आदेशाची पायमल्ली करत असल्याचे चित्र बार्शी मध्ये दिसत आहे.

संचार बंदी च्या काळामध्ये लोकांचे रोजगार ठप्प आहेत, व्यापारपेठ बंद आहे. प्रत्येक जण घरी आहे मात्र घरामध्ये अन्न शिजवण्यासाठी लागणारा घरगुती गॅस जर संपला तर तो आणायचा कसा याबाबत जिल्हाधिकारी यांनी सर्व गॅस वितरक एजन्सी यांना आदेशित केले होते की कोणत्याही परिस्थितीत घरगुती वापराचा गॅस सिलेंडर हा त्या ग्राहकाच्या उंबर्‍या पर्यंत नेऊन द्यायचा. मात्र बार्शीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे.

अचानक गेलेला गॅस पाहून नागरिक फोन द्वारे चौकशी करत आहेत. आपला नंबर लावत आहेत. मात्र नागरिकांना तुम्ही गॅस येऊन घेऊन जावा असे सांगितले जात आहे. संचारबंदी आणि कोरोना विषाणूची भीती यामुळे पोलिसांनी गाडीवर डबलसीट जाण्यावर बंदी लावलेली असल्याने आणि कारवाईच्या भीतीपोटी शेजारीपाजारी किंवा इतर नागरिक गादीवर गॅस धरून बसण्यास धजावत नाहीत. तेव्हा नागरिक आपल्या घरातील लहान मुलांना गाडीवरती पाठीमागे गॅस ची टाकी धरून बसण्यासाठी जातानाचे चित्र दिसत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार हा वृद्ध आणि लहान मुलांना त्रासदायक ठरत असताना लहान मुलांना अशा बेफिकीरपणे नागरिकांना केवळ मजबुरीने न्यावे लागत आहे. तेव्हा बार्शीतील सारब गॅस एजन्सी ना याबाबत प्रशासनाने तात्काळ विचारणा केली पाहिजे आणि जर जिल्हाधिकार्‍यांचा आदेश गॅस वितरक पाळत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.

Related Stories

सख्ख्या बहिणीला आस्मान दाखवत धनश्री फंड ठरली मंगळवेढा महिला केसरी

Patil_p

सोलापुरात कोरोनाचा चौथा मृत्यू; रुग्णांची संख्या 41 वर

Archana Banage

कस्तुरीला प्रदान करणार ‘शुभेच्छा व राष्ट्रध्वज’

tarunbharat

पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत

Archana Banage

जिह्यात अडीच हजार कोरोना केअर सेंटर उभारणार

Patil_p

पुणे-नगर महामार्गावरील विचित्र अपघातात 5 ठार

datta jadhav