Tarun Bharat

बार्शीत नगरसेवक, कर्मचारी यांच्यासह शहरात सर्वेक्षण करणार : मुख्याधिकारी

बार्शी/प्रतिनिधी

बार्शी शहरांमध्ये कोरोणा विषाणूचा फैलाव अधिक होऊ नये यासाठी आता नव्याने रुजू झालेल्या बार्शी नगर परिषद मुख्याधिकारी श्रीमती अमिता दगडे पाटील यांनी कंबर कसली असून पदभार घेतल्यापासून दोन दिवसांमध्ये त्यांनी नगर परिषदेच्या विविध विभागाचा आणि यंत्रणेच्या बैठका घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत तर आता स्वतः मुख्याधिकारी बार्शी शहराच्या सर्वेक्षणांमध्ये भाग घेणार असून रोज सकाळी एक प्रभाग आणि संध्याकाळी एक प्रभाग फिरून सर्वेक्षण करणार असे नियोजन करण्यात आले आहे. मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्याबरोबर त्यासंबंधित वार्डाचे नगरसेवक, तेथील पालक अधिकारी आणि इतर कर्मचारी वर्गही सर्वेक्षण करणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

या बाबत आज बार्शी नगरपरिषदेच्या कै. भाऊसाहेब झाडबुके सभागृहांमध्ये सर्व नगरसेवक , पालक अधिकारी यांची मुख्याधिकारी यांनी बैठक घेतली. या बैठकीस नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले उपस्थित होते. या वेळी पालक अधिकारी आणि नगरसेवक यांच्याशी वार्तालाप करताना मुख्याधिकारी यांनी सांगितले की , बार्शी शहरांमध्ये कोरोना चे प्रमाण घटत असले तरी येथून पुढे रुग्ण आढळणार नाहीत अशा प्रकारे नियोजन करावे लागणार आहे. यावेळी सर्व नगरसेवकांना त्यांनी आवाहन केले की आपल्या वार्डात घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करावे, पालक अधिकारी, आरोग्य सेवक आणि इतर यंत्रणा सर्वेक्षणासाठी आपल्या प्रभागात आल्यानंतर त्यांचे सोबत नगरसेवक यांनी वार्डात फिरावे आणि ज्यांना गंभीर लक्षणे किंवा दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत अशा नागरिकांची माहिती प्रशासनाला कळवावी. त्यांची कोरणा चाचणी घेण्याबाबत मार्गदर्शन करावे. सर्वेक्षण करत असताना आपल्या भागातील गरोदर महिलांची यादी वेगळी करून त्यांच्या आरोग्यावर ती लक्ष द्यावे लागणार आहे. या सर्वेक्षणामध्ये स्वतः मुख्याधिकारी यंत्रणे बरोबर शहरात फिरणार असल्याचेही त्यांनी आज बैठकीत सांगितले

Related Stories

Kolhapur Breaking : कोल्हापूरातील ७ वारकऱ्यांचा भरधाव कारने चिरडल्याने मृत्यु

Kalyani Amanagi

कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे शेतीपूरक शॉपिंग सेंटरचे भूमिपूजन

Archana Banage

सोलापूर : करमाळा शहरासह तालुक्यात 53 कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

Solapur : अज्ञात चोरट्यांकडून चार ठिकाणी घरफोडी; 74 हजाराचा माल लंपास

Abhijeet Khandekar

पंकजा मुंडेंचे आंदोलन भाजपकडून ‘हायजॅक’

prashant_c

मद्यधुंद ट्रकचालकाने दोघांना ठोकरले ; एक जखमी

Archana Banage