Tarun Bharat

बार्शीत मद्यपींचा दारू पिण्याचा परवाना काढण्याकडे कल

Advertisements

बार्शी/प्रतिनिधी


महाराष्ट्र राज्यात आज 31 मे पर्यंत लॉक डाऊन वाढण्याचा आदेश पारित झाला आहे. गेली अडीच महिने महाराष्ट्र राज्याने कोरोना या विषाणूचा संसर्ग नागरीकांमध्ये पसरू नये यासाठी सर्वतोपरी आणि पुरेपूर काळजी घेण्याचे धोरण आखले होते. त्याप्रमाणे राज्यातील सर्व पानटपरी, तंबाखूजन्य पदार्थ व इतर पदार्थ विकण्यासाठी, वाहण्यास बंदी घातली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारची देशी-विदेशी दारू विकण्यास पूर्णपणे मज्जाव घातला होता. त्यामुळे राज्यातील तळीरामांची काही बेचेन अशी अवस्था पाहायला मिळत होती. मात्र महसुलात वाढ होण्याच्या हेतूने काही जिल्ह्यांमध्ये वाईन शॉप अटी घालून उघडण्यास परवानगी दिली होती, मात्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात वाईन शॉप उघडण्यास मज्जाव केला होता. परंतु काही दिवस ऑनलाइन दारू विक्री होणार अशी बातमी येतात आणि ही दारूविक्री फक्त परवानाधारक यांना होणार आहे अशी बातमी येतात अचानक महाराष्ट्र शासनाच्या एक्साइज डिपार्टमेंट कडे दारू पिण्याचे लायसन मागणाऱ्यांची संख्या वाढली त्याचप्रमाणे बार्शीतील सर्व माहिती सेवा केंद्रे याठिकाणी मद्य परवाना काढण्यासाठी एकच गर्दी होत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र राज्यातील दुसरे लॉकडाऊन तीन मे ला संपणार होते. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यात वाईन शॉप उघडण्यास जिल्हा प्रशासनाने तयारी चालू केली होती. त्याचाच एक भाग म्हणून बार्शीतील असणाऱ्या तीन वाईन शॉप समोर गोल रिंगण आखून कटिंग करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी बार्शीतील मद्यपींचा उत्साह अनावर झालेला दिसत होता. अगदी सकाळपासूनच चार मे ला या वाइन शॉप समोर लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. परंतु चार मे ला दुपारी तीन वाजता सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सतरा मे पर्यंत मद्य विकण्यास मज्जाव करणारा आदेश काढला आणि बार्शीतील मद्यपींच्या आनंदावर विरजण पडले. मात्र आता तिसऱ्या लॉकडाऊनची मुदत 17 मे रोजी संपत असून 31 मे पर्यंत वाढवले आहे. परंतु शासनाने या चौथ्या लॉकडाऊनमध्ये वाईन शॉप उघडण्यास परवानगी देतील या आशेने आणि जर वाईन शॉप उघडले तर केवळ परवानाधारक यांनाच दारू मिळेल या भीतीने बार्शीतील अनेक मद्यपी सेवा केंद्रावर आणि खाजगी संगणकावर बसून दारू पिण्याचे लायसन काढत असल्याचे चित्र बार्शीत पहावयास मिळत आहे.

तर काही एजंट लोकांनी लायसन काढून मिळेल अशी जाहिरातच सोशल मीडियावर टाकल्याने अनेक मद्यपी दारू परवाना मिळण्यासाठी अर्ज करीत असल्याचे चित्र आहे. ज्या ज्या मद्य प्रेमींना ऑनलाइन परवाना मिळाला आहे ते आपल्या संबंधित मित्र आणि पाहुणे यांना परवाना व्हाट्सअप वर पाठवत आहेत त्यामुळे बार्शीत परवाना मिळवण्यासाठी स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. अर्थात लॉक डाऊन आज जरी वाढला असला तरी वाईन शॉप उघडण्या संदर्भात अजून कोणताही आदेश जिल्हा प्रशासनाने काढलेला नाही. त्यामुळे परवाना काढणारे तसे अजून तरी अधांतरीच आहेत. पण उद्या वाइन शॉप सुरू झाले तर आपला हक्क पाहिला असावा यामुळे बार्शीकर नागरिक जरा जास्तच मद्य परवाना बाबत जागृत झाल्याचे दिसत आहे.

Related Stories

जिल्हय़ातील हॉटस्पॉटमध्ये लवकरच ‘अँटीजेन टेस्ट’

Abhijeet Shinde

७ ऑक्टोबर पासून मंदिरे व धार्मिक स्थळे उघडणार, सरकारने जाहीर केली नियमावली!

Abhijeet Shinde

राष्ट्रीय आपत्तीत शिक्षक झाले पोलीस

Patil_p

गांधीजींच्या विचाराशिवाय राष्ट्रसुधारणा नाही

Abhijeet Shinde

बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

Patil_p

देशातील हुतात्म्यांच्या आदर्शाची जपणूक करुयात..

Patil_p
error: Content is protected !!