Tarun Bharat

बार्शीत रुग्ण वाढले, आज ६ पॉझिटिव्ह

बार्शी / प्रतिनिधी

मुंबई-पुणे या सारख्या महानगरात गोंधळ घालणारा कोरोना विषाणू चा बार्शी तालुक्यात शिरकाव झाला असून आता बार्शी तालुक्यात आज सहा नवीन रुग्णांची नोंद झाली तर यापूर्वी असणारे सहा आणि आज वाढलेले 6 अशी एकूण रुग्णसंख्या बार्शी तालुक्यात 12 एवढी झाली आहे. मुळात या सर्व रुग्ण यांची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांचे थेट मुंबई किंवा पुणे कनेक्शन समोर येत आहे केवळ स्थलांतरित लोकांमुळे बार्शी तालुक्यात रुग्ण संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

येथील आरोग्य प्रशासनाने शनिवारी बाधित रुग्णांच्या संपर्कातील एकूण १४ जणांचे स्वॅब तपासणीसाठी सोलापूरला पाठविले. शुक्रवारी पाठविलेले २१ स्वॅब पैकी १४ अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाले ते सर्व १४ अहवाल निगेटिव्ह होते. मात्र आज रविवारी सकाळी २१ पैकी प्रलंबित असलेल्या ७ जणांचे अहवाल रिपोर्ट आले असून त्यातील  सहा जणांचे अहवाल ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आले आहेत.  शनिवारचे १४ अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष जोगदंड यांनी याबाबतची माहिती दिली. 

बार्शी तालुक्यात वैराग, जामगांव आ, पाठोपाठ शेंद्री येथे रूग्ण सापडले. नंतर यात जामगांव आ मध्ये तीन रूग्णांची वाढ झाली. त्यामुळे बाधित रूग्णांची संख्या ६ वर पोहोचली होती. जामगांव आ येथील सुरूवातीचा एक रूग्ण मृत असून ५ जणांवर उपचार सुरू आहेत. रविवारी सकाळी आलेल्या अहवालात शेंद्री येथील पॉझिटिव्ह असलेल्या रुणाच्या संपर्कातील चार, जामगावच्या रुग्णाच्या संपर्कातील एक तर पुण्याहून रातंजन आलेली व गावातील क्वारन्टाईन सेंटरमध्ये दाखल असलेली एक मुलगी जिचा स्वॅब खाजगी हॉस्पिटलमधून पाठवला होता. ती ही पॉझिटिव्ह आली आहे.

शुक्रवारी पाठविलेल्या जामगांवच्या ४ पैकी ३, वैराग ६ पैकी ५, खाजगी हॉस्पीटल- १ पैकी १, शेंद्री ७ पैकी २, बार्शी २ पैकी २, उक्कडगांव १ पैकी १ असे २१ पैकी १४ अहवाल प्राप्त झाले असून सर्व १४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारचे ७ अहवाल प्रलंबित होते, त्यातील सहा पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आला आहे.  शनिवारी पुन्हा जामगांव आ येथील ७ तर बार्शी शहरातील ७ अशा १४ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले आहेत.  हे सर्व अहवाल प्रलंबित आहेत.

Related Stories

सोमय्यांसाठीचा जिल्हा बंदी आदेश रद्द

Archana Banage

भारताचे क्षेत्रणास्त्र चुकून पाकिस्तानमध्ये

Patil_p

खरीप हंगामातील खते, बी-बियाणांचा सुरळीत पुरवठ्यासाठी नियोजन करणार : पालकमंत्री पाटील

Archana Banage

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मान्यवरांकडून अभिवादन

Abhijeet Khandekar

पंजाब : एका गावात 34 कोरोनाबाधित

Patil_p

प्रयत्नान्ती असाध्य असे काही नाही

Tousif Mujawar