बार्शी/प्रतिनिधी:
बार्शी तालुक्यातून रेशनचा तांदूळ काळ्याबाजारात विकण्यासाठी नेत असताना पनवेल पोलिसांनी सुमारे एकशे दहा टन तांदूळ जप्त केला होता. या रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांची चौकशी चालू असतानाच परत एकदा बार्शी येथील मार्केट कमिटीच्या एका गाळ्यातून रेशनचे धान्य विकण्यासाठी आणलेले असताना बार्शी पोलिसांनी जप्त केले आहे.
बार्शी पोलिसांत दाखल झालेल्या गुन्ह्या नुसार जवळपास 75 कट्टे तांदूळ आणि 76 कट्टे असा माल जप्त करण्यात आला आहे. अगदी दोन दिवसापूर्वी एकशे दहा टन तांदूळ पोलिसांनी पकडलेला असताना परत एकदा रेशनचा काळाबाजार होत आहे ही गंभीर बाब असून आता पोलीस आणि महसूल प्रशासना समोर रेशनचा गोरख धंदा आणि काळाबाजार थांबवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बार्शी उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयाचे कर्मचारी संदेश पवार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत असलेल्या माहितीनुसार पोलीस विभागीय अधिकारी यांना बार्शी येथील मार्केट कमिटी गाळा क्रमांक 193 याठिकाणी उस्मानाबाद येथील एक इसम 76 टक्के तांदूळ आणि 75 टक्के गहू रेषांचा काळ्या बाजारात विकण्यासाठी आणला आहे अशी माहिती समजताच उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार पवार आणि त्यांचे सहकारी वरपे, भांगे, लगदिवे, बागल हे सर्वजण या त्या गाळ्यामध्ये पोहोचले असता त्या ठिकाणी त्यांना त्या गाळ्याचे मालक उद्धवराव काळदाते रा. दत्तनगर, बार्शी हे उपस्थित होते.
पोलिसांना त्या ठिकाणी 151 पोती तांदूळ आणि गहू आढळला याविषयी त्यांनी अधिक माहिती घेतली असता हे सर्व रेशनचे धान्य विकण्यासाठी आणले होते असे समजले. मात्र त्यांच्याकडे कोणत्याही नोंदी किंवा पावत्या नसल्याने हे रेशनचे धान्य काळ्याबाजारात विकण्यासाठी आणले होते असे सिद्ध झाल्याने आणि शासनाची फसवणूक केल्याने मार्केट कमिटी गाळामालक उद्धव काळदाते आणि ज्ञानेश्वर पवार यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान 420 , 34 सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास बार्शी शहर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी हे करीत आहेत.