बार्शी / प्रतिनिधी
बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये कोरोना आणि सारी या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. आज जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तालुक्यामध्ये 109 रुग्ण सापडले आहेत. बार्शी शहर संपूर्णपणे लॉकडाऊन होत असताना आज पहिल्या दिवशी 109 रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असतानाच बार्शी तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. आता नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे एवढाच एक पर्याय असल्याचे मत आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही व्यक्त केले होते. बार्शी मध्ये वाढणारी संख्या चिंताजनक असून बार्शी ने धोक्याची पातळी ओलांडली आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.


previous post