Tarun Bharat

बार्शी तालुक्यातून दोन जण हद्दपार

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग

वैराग पोलीस ठाण्यामध्ये वाळूचोरी आणि मारहाणीचे विविध गुन्हे दाखल असलेल्या दोघांना बार्शी तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या गुन्हेगारांमध्ये सैफन गालिब शेख आणि बंडू अभिमान सातपुते या दोघांचा समावेश आहे. याबाबत वैराग पोलीसांकडून मिळालेली अधिक माहीती अशी की,वाळूचोरी आणि मारहाणीच्या अनेक गुन्ह्यात आरोपी असलेले सैफन गालिब शेख, बंडू अभिमान सातपुते (दोघे रा. वैराग ) यांना मुंबई पोलीस कायदा १९५१चे कलम ५६ अन्वये उपविभागीय दंडाधिकारी यांनी सहा महीन्यांसाठी बार्शी तालुक्यातून हद्दपार केले आहे. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस प्रमुख अतुल झेंडे, डीवायएसपी सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, हवालदार अनिल गोटे,पो शि अजय भुरले, महिला पोलीस ज्योती जाधव यांनी केली.

Related Stories

भाजपला धक्का : मुंबई आणि नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला

prashant_c

सोलापूर : लखीमपूर हिंसाचार; काँग्रेसतर्फे करमाळात वाहण्यात आली श्रद्धांजली

Archana Banage

शहरात आढळले तब्बल १०६ रुग्ण

Archana Banage

मोठी ब्रेकींग : करमाळ्यात रेल्वे अपघात; मालगाडी रुळावरून घसरली

Abhijeet Khandekar

डाळिंब बागांना उन्हाचा फटका, काय आहेत उपाययोजना ?

Archana Banage

नरंदेत विविध विकासकामांचा शुभारंभ

Archana Banage