Tarun Bharat

‘बार्शी नगर पालिकेच्यावतीने अत्यल्प दरात कोविड सेंटर सुरू करा’

प्रतिनिधी / बार्शी

बार्शी तालुका ग्रामीण भागात आणि शहरातील वाढत्या कोरोना रुग्णासंख्येमुळे अधिकचे कोविड सेंटर आणि गतीमान लसीकरणासंदर्भात बानपा विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना पत्र लिहिले आहे. त्यात, प्रामुख्याने बार्शी नगर पालिकेच्यावतीने जवाहर रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी अक्कलकोटे यांनी केली आहे.

बार्शी शहर व परिसरात दिवसेंदिवस कोव्हिड रुग्णांची संख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता उपलब्ध असणारी कोव्हिड सेंटर या मधील उपलब्ध बेडची संख्या लक्षात घेता सर्वसामान्य व गरीब रुग्ण उपचारापासून लांब राहत आहे. पर्यायी मृत्यू ओढवतो आहे. तसेच, खासगी डेडिकेटेड कोविड सेंटरमधील खर्च सामान्यांना न परवडणारा आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर बार्शी नगरपरिषदेच्यावतीने जवाहर हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करून अत्यल्प आणि सवलतीच्या दरात कोविड रुग्णांवर उपचार करण्यात यावेत, अशी मागणी अक्कलकोटे यांनी पत्राद्वारे केली आहे. शासनाने ठरविल्याप्रमाणे तात्पुरता हॉस्पिटल स्टाफ नेमणेची कार्यवाही करण्यात यावी. तसेच, सदर कार्यवाहीसाठी संबंधितांना तात्काळ आदेश देऊन कार्यवाहीच्या सूचना देण्यात याव्यात. आवश्यकता भासल्यास नगरपरिषदेची विशेष सभा बोलवणेबाबत सूचित करण्यात यावे.

कोविड रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी बार्शी नगर परिषदेच्यावतीने लसीकरणाचा संपूर्णता खर्च उचलून मोफत लसीकरण वेगवान पद्धतीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी. त्यामुळे, जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण झाल्यास कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत होईल, असे अक्कलकोटे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्येत बार्शी तालुका अग्रस्थानी आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनानेही बार्शीकडे प्राधान्याने लक्ष दिले आहे. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात कडक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

Related Stories

Solapur : हसापूर येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या

Abhijeet Khandekar

जलयुक्त शिवारची कामं थांबवली !

prashant_c

”त्या” मुख्याध्यापकाला झाली अटक

Archana Banage

सायकल रॅलीद्वारे बाल कामगार प्रथेविरुद्ध जनजागृती

prashant_c

सोलापूर : पंढरपूर भाजपा शहराध्यक्षांचा कोरोनामुळे मृत्यू

Archana Banage

सोलापुरात नव्याने सात कोरोना बाधित रुग्णांची भर

Archana Banage