Tarun Bharat

बार्शी शहरात दोन कोरोना रुग्णांची वाढ

बार्शी/प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा विळखा बार्शी शहरात अधिक घट्ट होत असून आज दिनांक 19 जून रोजी सकाळी नऊ वाजता प्राप्त झालेल्या सतरा अहवाल यापैकी दोन अहवाल हे बार्शी शहर, उपळाई रोड येथील पॉझिटिव्ह आले असल्याने शहरभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज आलेले दोन अहवाल हे उपळाई रोड येथील नामांकित डॉक्टर यांच्या संपर्कातून पॉझिटिव झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी संतोष जोगदंड यांनी दैनिक तरुण भारत सव्वाशे बोलताना दिली.

बार्शी शहरासह 18 जून पर्यंत ग्रामीण भागा सहित एकूण 40 अहवाल प्रलंबित होते. त्यातील बार्शी शहरातील 26, वैराग येथील दहा पांगरी येथील दोन , खांडवी येथील एक,कुसलंब येथील एक असे अहवाल प्रलंबित असून आता खांडवी मधील अहवाल पूर्ण निगेटिव्ह आले आहेत तर आता सध्या 23 प्रलंबित असून त्यांचे रिपोर्ट संध्याकाळपर्यंत येणे अपेक्षित आहे. बार्शी शहरांमध्ये सोलापूर रोड येथील बगले बरड येथे तीन रुग्ण पॉझिटिव्ह असून वाणी प्लॉट येथील पॉझिटिव रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी गेले असल्याची माहिती ही त्यांनी दिली तर आता उपळाई रोडला तीन पॉझिटिव्ह झाले असून त्यातील एक पॉझिटिव्ह रुग्ण पुणे येथील खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहे. बार्शी शहरांमध्ये रोज वाढणारी गर्दी आणि नागरिकांचा बेजबाबदारपणा यामुळेसुद्धा शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता फोफावत आहे. त्यामुळे नागरिकांनी शारीरिक अंतर राखून तोंडाला कंपल्सरी मास्क वापरणे आणि शक्यतो स्वतःचे शरीर आणि घर निर्जंतुक करण्याकडे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही जोगदंड यांनी सांगितले

Related Stories

४० डोक्यांच्या रावणानं प्रभु श्रीरामाचं शिवधनुष्य गोठवलं, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Archana Banage

नळी येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

Archana Banage

भरधाव कार झाडावर आदळुन पाचजण जागीच ठार

Abhijeet Khandekar

“औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांसोबत युती नाही…”

Archana Banage

महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटचे 21 रुग्ण : राजेश टोपे यांची माहिती

Tousif Mujawar

शिवसेनेचे राज्यपालांना पत्र म्हणजे रडीचा डाव; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

Archana Banage