Tarun Bharat

बार्शी – सोलापूर दरम्यान विचित्र अपघात

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / वैराग
  बार्शी -सोलापूर रोड काळेगावपाटी वर विचित्र अपघात होऊन, या अपघातात दोन दुचाकी वाहनांची धडक झाली, यात दोन्ही दुचाकी जळून खाक, एक ठार,तिघे गंभीर आहेत.मुलीच्या लग्नाच्या दोन दिवस आगोदर वडिलांचा दुर्देवी मुत्यू झाला आहे. रामचंद्र अश्वमेद मोटे रा. वाळूज ( ता. मोहोळ ) असे अपघातात मयत झालेल्या पित्याचे नाव असून, या घटनेने वाळूज गावावर शोककळा पसरली आहे. बार्शी ते सोलापूर रोडवर काळेगाव ( ता. बार्शी ) येथील पाटीजवळ हा विचित्र अपघात झाला. असून दोन्ही दुचाकीमध्ये समोरासमोर जोरदार धडक बसल्याने दोन्ही दुचाकींनी पेट घेतला. यामध्ये एक जण मयत व तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी ६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.४५ वाजता दरम्यान ही घटना घडली.

      हा अपघात एवढा भिषण होता की, दोन्ही दुचाकी पेटून आगीचा मोठा लोळ उ़ठला होता. यामध्ये रामचंद्र अश्वमेद मोटे ( ४५) . रा. वाळूज ता. मोहोळ, यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा भाऊ सुरतिशेन अश्वमेद मोटे ( ४७ ) हे गंभीर जखमी झाले आहेत.मयत रामचंद्र मोटे यांच्या मुलीचा विवाह ९ फेब्रुवारी ला.असताना ही दुर्देवी घटना घडली आहे.जखमींना बार्शी येथे उपचार सुरू असून या अपघाताची नोंद वैराग पोलीसांत झाली आहे.

Related Stories

सोलापुरात आणखी पाच नवीन कोरोना रुग्ण; संख्या 30 वर

Archana Banage

दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन

Archana Banage

मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रामभाऊ गायकवाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Archana Banage

मृत्यूदर कमी करण्यासाठी अँटीजेन टेस्टचा वापर करा : विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

Archana Banage

शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार : रघुनाथ पाटील

prashant_c

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा – आ. राणाजगजितसिंह पाटील

Archana Banage