Tarun Bharat

बार्सिलोनाकडे कोपा डेल रे फुटबॉल चषक

Advertisements

वृत्तसंस्था/ माद्रीद

अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू लायोनेल मेसीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर शनिवारी येथे बार्सिलोना फुटबॉल क्लबने कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा जिंकताना अंतिम सामन्यात ऍथलेटिक बिलबाओचा 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात मेसीने दोन गोल नोंदविले.

या अंतिम सामन्यात 33 वर्षीय मेसीने बार्सिलोना संघाचा पहिला आणि तिसरा गोल नोंदविला. नवे प्रशिक्षक रोनाल्ड कोमेन यांच्या मार्गदर्शनाखाली बार्सिलोना संघाने ही महत्त्वाची पहिली स्पर्धा जिंकली आहे. ला लीगा स्पर्धेतील यापूर्वीं झालेल्या सामन्यात ऍथलेटिक बिलबाओने बार्सिलोनाला पराभूत केले होते. तर गेल्या जानेवारीत स्पॅनीश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाचा ऍथलेटिक बिलबाओने पराभव केला होता. शनिवारच्या सामन्यात बार्सिलोनातर्फे 60 व्या, 63 व्या, 68 व्या आणि 72 व्या मिनिटाला असे चार गोल नोंदविले गेले.

Related Stories

चहापानाअखेर इंग्लंड 36 धावांनी आघाडीवर

Patil_p

कोरोनामुळे पाकमधील हॉकी मृत्यू शय्येवर : बाजवा

Patil_p

हॅलेप, कोको गॉफ दुसऱया फेरीत

Patil_p

धावपटू अविनाश साबळेचा नवा राष्ट्रीय विक्रम

Patil_p

विनोद कांबळी आर्थिक अडचणीत!

Patil_p

व्हेलॉसिटी-सुपरनोव्हाज आज अंतिम लढत

Patil_p
error: Content is protected !!