Tarun Bharat

बार्सिलोनाचा निसटता विजय, मेसीचा 500 वा सामना

वृत्तसंस्था/ माद्रीद

स्पेनमध्ये खेळविण्यात येत असलेल्या ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील रविवारी झालेल्या सामन्यात लायोनेल मेसीच्या बार्सिलोना संघाने हय़ुस्कावर 1-0 अशा गोलफरकाने निसटता विजय मिळविला. अर्जेंटिनाचा मेसी याचा हा ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील 500 वा सामना होता.

दुखापतीमुळे गेल्या वर्षीच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्याला मेसीला मुकावे लागले होते. त्याच्या घोटय़ाला दुखापत झाली होती. ला लीगा स्पर्धेतील मेसीचा हा  500 वा सामना आहे. या स्पर्धेत असा पराक्रम करणारा मेसी हा पहिला विदेशी फुटबॉलपटू आहे. रविवारच्या सामन्यात मेसीच्या पासवर जाँगने बार्सिलोनाचा एकमेव निर्णायक विजय गोल नोंदविला.

या स्पर्धेतील अन्य एका सामन्यात ऍटलेटिको माद्रीदने अल्वेसचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. माद्रीदतर्फे निर्णायक गोल लुईस सुवारेझने केला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात ऍटलेटिको माद्रीद आघाडीवर आहे. या सामन्यात ऍटलेटिको माद्रीदचे खाते लोरेंटीने उघडले. त्यानंतर अल्वेसला मेंडीझोरोझाने बरोबरी साधून दिली. सामन्यातील शेवटच्या मिनिटाला सुवारेझने ऍटलेटिको माद्रीदचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदविला. ऍथलेटिक बिलबाओने इलेचीवर 1-0 अशी मात केली.

Related Stories

कँडी वॉरियर्सच्या विजयात रवी बोपाराचे अर्धशतक

Patil_p

जयवर्धने, ब्रिटीन, शॉन पोलॉकचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश

Patil_p

पी. कश्यप उपांत्यपूर्व फेरीत, सामिया फारुकी पराभूत

Amit Kulkarni

कोरोनाग्रस्तांसाठी थिएमची मदत

Patil_p

हॉकी मानांकनात भारत पाचव्या स्थानी

Patil_p

सेरेना, पिरोन्कोव्हा चौथ्या फेरीत

Patil_p