Tarun Bharat

बार्सिलोनाच्या कोमेनवर दोन सामन्यांची बंदी

Advertisements

वृत्तसंस्था/ माद्रीद

ला लीगा फुटबॉल स्पर्धेतील आगामी होणाऱया ऍटलेटिको आणि व्हॅलेन्सिया बरोबरच्या दोन सामन्यासाठी बार्सिलोनाचे प्रशिक्षक रोनॉल्ड कोमेन यांच्यावर स्पॅनीश फुटबॉल फेडरेशनने बंदी घातली आहे.

या स्पर्धेतील ग्रेनेडा येथे गेल्या गुरूवारी झालेल्या सामन्यात बार्सिलोना संघाला अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. स्पॅनीश फुटबॉल फेडरेशनने या सामन्यावेळी कोमेन याला रेड कार्ड दाखविले होते. त्यानंतर कोमेन यांनी शिस्तपालन नियमांचा भंग केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पुढील शनिवारी बार्सिलोना आणि ऍटलेटिको माद्रीद यांच्यात सामना होणार आहे. त्याच त्यानंतर बार्सिलोनाचा पुढील सामना व्हलेन्सियाबरोबर होणार आहे. या दोन्ही सामन्यासाठी कोमेनवर बंदी घालण्यात आली आहे. ला लीगा स्पर्धेच्या गुणतक्त्यात ऍटलेटिको माद्रीद पहिल्या, रियल माद्रीद दुसऱया आणि बार्सिलोना 71 गुणांसह तिसऱया स्थानावर आहेत.

Related Stories

दिल्ली कॅपीटल्सला धक्का! अश्विनने ‘या’ कारणासाठी घेतला IPL मधून ब्रेक

Tousif Mujawar

मोहालीत ‘किंग कोहली’वर फोकस!

Amit Kulkarni

चेन्नई सुपरकिंग्स चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन्स!

Patil_p

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या रचनेत बदल होणार

Patil_p

भारत अ संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिल

Patil_p

चार दिवसांच्या कसोटीला सचिनचा स्पष्ट नकार

Patil_p
error: Content is protected !!