Tarun Bharat

बार्सिलोनाच्या मेस्सीचा नवा विश्वविक्रम

एकाच क्लबकडून सर्वाधिक गोल करण्याचा पेले यांचा विक्रम मोडित

वृत्तसंस्था / व्हॅलाडोलिड, स्पेन

स्पॅनिश ला लिगा फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात बार्सिलोनाने रियल व्हॅलाडोलिडचा 3-0 असा धुव्वा उडविला. मेस्सीने या सामन्यात बार्सिलोना क्लबतर्फे 644 वा गोल नोंदवत माजी महान फुटबॉलपटू पेले यांचा एकाच क्लबतर्फे सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विश्वविक्रम मागे टाकला.

मेस्सीने पुरविलेल्या क्रॉसवर क्लेमेंत लेंगलेटने 21 व्या मिनिटाला हेडरवर गोल नोंदवून बार्सिलोनाला आघाडीवर नेले. बार्सिलोनाच्या दुसऱया गोलमध्येही मेस्सीचा हात होता. त्याने राईटबॅक सर्जिनो देस्तला चेंडू पुरविला. त्याने क्रॉस फटक्यावर मार्टिन बेथवेटकडे चेंडू पुरविला. त्याने त्यावर अचूक गोल नेंदवून 35 व्या मिनिटाला बार्सिलोनाची आघाडी 2-0 अशी केली. उत्तरार्धातील मध्यावर मेस्सीने नवा विक्रम नोंदवणारा गोल नोंदवला. पेड्रीकडून पास मिळवित त्याने आगेकूच केली आणि अचूक फटक्यावर हा गोल नोंदवला. यापूर्वी पेले यांनी सँटोस क्लबतर्फे खेळताना 643 गोल नोंदवण्याचा विक्रम केला होता. जादा वेळेत मेस्सीला आणखी एक गोल करण्याची संधी मिळाली होती. पण त्याचा फटका बारला लागून बाहेर गेला. बार्सिलोनाचे आता 14 सामन्यांतून 24 गुण झाले असून ते पाचव्या स्थानावर आहेत. ऍटलेटिको माद्रिद 13 सामन्यांत 32 गुण मिळवित आघाडीवर आहे. त्यांनी मंगळवारच्या सामन्यात रियल सोशियादादवर 2-0 असा विजय मिळविला.

Related Stories

ब्राझीलची बियाट्रिझ हदाद माइया अजिंक्य

Patil_p

विराट, इशांतला पहिला डोस

Patil_p

मोहम्मद सिराजला पितृशोक, तरीही दौऱयात कायम राहणार

Patil_p

नेसरबरोबरचा सरेचा करार रद्द

Patil_p

बीसीसीआयची स्थिती… तेलही गेले, तूपही गेले!

Patil_p

आयओएची पहिली महिला अध्यक्ष पी. टी. उषा

Patil_p