Tarun Bharat

बार्सिलोना, रियल माद्रीद खेळाडूंची कोरोना चांचणी

वृत्तसंस्था/ माद्रीद

स्पेनमधील ला लीगा फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया बार्सिलोना आणि रियल माद्रीद फुटबॉल क्लबच्या फुटबॉलपटूंची आगामी प्रशिक्षण सरावापूर्वी कोरोना चांचणी घेण्यात आली असे क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.

स्पेनमध्ये कोरोना महामारीच्या संकटाने भीषण रूप धारण केल्याने या देशात हजारो जणांचा कोरोना महामारीत बळी गेला असून लाखो लोकांना याची लागण झाली. स्पेनमधील फुटबॉल हंगाम स्थगित करण्यात आला. आता पुढील महिन्यात फुटबॉल प्रशिक्षणाला प्रारंभ करण्याची योजना आखण्यात आली असून बार्सिलोना व रियल माद्रीदच्या फुटबॉलपटूंची कोरोना चांचणी घेण्यात आली. या क्लबच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये बुधवारी सकाळी या दोन्ही क्लबच्या फुटबॉलपटूंचे आगमन झाले. त्याचप्रमाणे ऍटलेटिको माद्रीदच्या फुटबॉलपटूंची कोरोना चांचणी घेण्यात येणार आहे. स्पेनमधील ला लीगा फुटबॉल स्पर्धेचा हंगाम बंदीस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना संपविण्यात येईल, असे सांगण्यात आले. जूनच्या उत्तरार्धात या स्पर्धेतील सामन्यांना प्रारंभ केला जाईल.

Related Stories

‘बायो-बबल’मुळे मानसिक संतुलन ढळण्याचा धोका

Patil_p

विंडीज संघात गॅब्रियलचा समावेश

Patil_p

जूनमध्ये भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱयावर

Patil_p

मारक्विनोस अर्सेनेलमध्ये दाखल

Patil_p

युरोपियन चॅम्पियनशिप्स, स्विस ओपन स्पर्धा रद्द

Patil_p

चीनच्या फुटबॉल क्लबची हकालपट्टी

Patil_p