Tarun Bharat

बार्सिलोना स्पर्धेत नदाल उपांत्य फेरीत

वृत्तसंस्था/ बार्सिलोना

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या बार्सिलोना खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनच्या द्वितीय मानांकित राफेल नदालने ब्रिटनच्या कॅमेरून नुरीचा पराभव करत एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.

या स्पर्धेतील टॉप सीडेड नदालने शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नुरीचा 6-1, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. नदालने ही स्पर्धा आतापर्यंत 11 वेळा जिंकली आहे. त्याने 2005 साली आपल्या वयाच्या 18 व्या वर्षी पहिल्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते. दुसऱया एका सामन्यात ग्रीकच्या सित्सिपसने ऍलीसिमेचा 6-3, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. इटलीच्या 19 वर्षीय सिनेरने या स्पर्धेची पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठताना रशियाच्या रूबलेव्हचे आव्हान 6-2,7-6 (8-6) असे संपुष्टात आणले.

Related Stories

रियल माद्रीद संघाचे लक्ष विजयावर

Patil_p

अर्जुन इरिगेसीची अग्रस्थानी झेप

Patil_p

विनेश फोगटची कोरोनावर मात

Patil_p

कॅमेरुन व्हॉईट निवृत्त

Patil_p

राजस्थान रॉयल्सला दिलासा त्या महागडय़ा खेळाडूचा सराव सुरू

Patil_p

पी.हरिकृष्णचा कार्लसनवर सनसनाटी विजय

Patil_p