Tarun Bharat

बार असोसिएशनतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

प्रतिनिधी /बेळगाव

वकील हे नेहमी तणावाखाली असतात. त्यामुळे त्यांना आरोग्य समस्येला तोंड द्यावे लागते. त्यासाठी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा वकिलांनी लाभ घेतला.

गणेशपूर रोडवरील एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजच्यावतीने मंगळवारी बार असोसिएशनच्या समुदाय भवनमध्ये हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. साहाय्यक प्राचार्य डॉ. अडिवेश अरकेरी, हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. अनिल कुरंगी, पंचकर्मा विभागाच्या डॉ. अश्वथ, डॉ. अश्विनी, डॉ. मंजुळा, डॉ. चेतन यांच्यासह इतर डॉक्टर उपस्थित होते. बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यतनट्टी, उपाध्यक्ष सचिन शिवण्णावर, उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, जनरल सेपेटरी ऍड. गिरीराज पाटील, जॉईंट सेपेटरी ऍड. बंटी कपाई, सदस्य ऍड. महांतेश पाटील, ऍड. अभिषेक उदोशी, ऍड. आदर्श पाटील, ऍड. इरफान बयाळ, ऍड. पी. के. पवार, महिला प्रतिनिधी ऍड. पूजा पाटील यांनी शिबिर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. या शिबिरामध्ये 300 हून अधिक वकिलांनी लाभ घेतला.  

Related Stories

चंद्रशेखर इंडी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Patil_p

मागण्या मान्य करा अन्यथा भव्य मोर्चा शेतकऱ्यांच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

mithun mane

मळेकरणी हायस्कूलचा क्रीडा महोत्सव थाटात

Amit Kulkarni

‘दसरोत्सवाची चाहूल, खरेदीसाठी मार्केट फुल्ल’

Amit Kulkarni

‘डिफेक्टिव्ह सायलेन्सर’ विरुद्ध पोलिसांची मोहीम

Amit Kulkarni

बेळगाव-धारवाड रेल्वेचा शुभारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!