Tarun Bharat

बालकामगाराच्या मृत्यूप्रकरणी बिल्डर, मालकाविरुद्ध गुन्हा

Advertisements

मृतदेह बाहेर काढून केली उत्तरीय तपासणी

प्रतिनिधी/ बेळगाव

बांधकामासाठी खोदाई करताना कंपाऊंडची भिंत अंगावर पडून सोनट्टी येथील एका 16 वषीय मुलाचा मृत्यू झाला होता. बुधवारी सकाळी नेहरुनगर येथे ही घटना घडली होती. बिल्डर व मालकाने हे प्रकरण दडपले होते. कामगार खात्याच्या अधिकाऱयांनी त्या दोघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

गुरुवारी वरि÷ अधिकाऱयांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढून उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून कामगार खात्याचे अधिकारी अशोक बाळीगट्टी यांनी मालक व बिल्डर विरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

पुनीत शामाप्पा सुतगट्टी (वय 16) असे त्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. पोलीस किंवा तत्सम यंत्रणेला न कळविता परस्पर प्रकरण दडपल्याप्रकरणी इम्रान किल्लेदार (रा.सदाशिवनगर), मजर जमीलअहम्मद नेसरी (रा. शिवबसवनगर) या दोघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी पुढील तपास करीत आहेत.

पुनीत हा बांधकामावर कामासाठी येत होता. बुधवारी सकाळी खोदाई करताना शेजारच्या कंपाऊंडची भिंत अंगावर कोसळून हा मुलगा गंभीर जखमी झाला. सुरुवातीला त्याला खासगी इस्पितळात हलविण्यात आले. नंतर सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. सिव्हिलला पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. कोणालाही न कळविता बुधवारी रात्री परस्पर दफनविधी करण्यात आला.

गुरुवारी प्रांताधिकारी अशोक तेली, मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प आदी अधिकाऱयांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढून सोनट्टी येथे शवचिकित्सेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

घटनेला जबाबदार कोण?

बाल कामगार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जातात. तरीही बांधकाम व्यवसायात मोठय़ा प्रमाणात बाल कामगार सक्रिय आहेत. पुनीतच्या मृत्यू प्रकरणाला जबाबदार कोण? पोलिसांना न कळविता बिल्डर व मालकाने परस्पर प्रकरण का मिटविले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी 304(ए), 201, 176 सहकलम 34, ऍट्रॉसिटी व बाल कामगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

दोन लाख कुटुंबे हक्काच्या छप्पराविना

Amit Kulkarni

मार्कंडेयनगर ग्रा. पं. सदस्यांची ‘तरुण भारत’ ला भेट

Patil_p

हलगा सांडपाणी प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही

Patil_p

रामदुर्ग येथे ‘आई नमन’ कार्यक्रम उत्साहात

Patil_p

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे त्या घटनेचा निषेध

Amit Kulkarni

वैश्यवाणी महिला मंडळातर्फे पाककृती स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni
error: Content is protected !!