Tarun Bharat

बालचमूंना किल्ले साकारण्याचे वेध

आकर्षक किल्ले साकारण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात बालचमूंची लगबग

प्रतिनिधी /बेळगाव

दिवाळी अवघ्या आठ-दहा दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरासह ग्रामीण भागातील बालचमूंना किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारण्याचे वेध लागले आहेत. दरवषीप्रमाणे यंदादेखील आकर्षक किल्ले साकारताना बालचमूंची लगबग दिसून येत आहे.

गतवषी कोरोनामुळे बालचमूंच्या उत्साहावर पाणी फिरले होते. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बालचमू शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱया गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती साकारताना दिसत आहेत. बालचमूंची राजगड, रायगड, सुधागड, लोहगड, विजयदुर्ग आदी किल्ले साकारण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. किल्ले साकारण्यासाठी बालचमू दगड, माती व इतर साहित्य जमा करण्यात दंग झाले आहेत. दरम्यान कोरोनामुळे पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग बंद आहेत. त्यामुळे बालचमू किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारत आहेत. स्वतःच्या कल्पनेतून विविध किल्ले साकारण्यासाठी बालचमूंची धडपड सुरू आहे.

दिवाळीनिमित्त शहरासह ग्रामीण भागात गल्लोगल्ली किल्ले उभारले जातात. शिवरायांच्या काळातील शौर्य, मावळे आणि इतिहास या किल्ल्यांच्या माध्यमातून साकारण्यात येतो.

बाजारात विविध किल्ल्यांचा प्रतिकृती उपलब्ध…

दिवाळी सण जवळ आल्याने बाजारात विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती, मावळे, गड, बुरूज विक्रीसाठी दाखल झाले आहेत. विविध आकारातील व आकर्षक शिवरायांच्या प्रतिकृती बालचमूंना आकर्षित करत आहेत.

Related Stories

चौथ्या दिवशीही शेतकऱयांचे आंदोलन सुरूच

Amit Kulkarni

पदवीपूर्व प्रथम वर्षाला प्रारंभ

Amit Kulkarni

मण्णिकेरी येथील पीडीओंना केल्या सूचना

Omkar B

व्हॅलेंटाईन डे वर प्रतिबंध घालण्याची मागणी

Amit Kulkarni

तालुक्याच्या पूर्वभागातही कडकडीत बंद

Amit Kulkarni

कडधान्य; डाळींच्या किमतीत भरमसाट वाढ

Patil_p
error: Content is protected !!