Tarun Bharat

बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय

Advertisements

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

भारतीय जवानांनी फेब्रुवारी 2019 मध्ये बॉम्बहल्ला करून उध्वस्त केलेला बालाकोटमधील दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाला आहे. गुप्तचर विभातील सूत्रांच्या हवाल्याने एका संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे. 

बालाकोटमध्ये दहशतवाद्यांनी नव्याने तळ उभारला आहे. जैश आणि इतर संघटनांच्या दहशतवाद्यांना भारतात घुसवण्यासाठी या तळावर नियोजन केले जाते. लष्करी आस्थापनांवर दहशतवादी हल्ले घडवण्यात सराईत असलेला जैश-ए-महम्मदचा कमांडर जुबेर याच्यावर तेथील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची जबादारी सोपविण्यात आली आहे. जुबेर हा अफगाणिस्तानात नाटो राष्ट्रांच्या फौजांविरोधातही लढतो. 

या दहशतवादी तळावर सध्या 27 दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामधील 8 जण पाकव्याप्त काश्मीरमधील आहेत. दरम्यान, पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटात 40 हून अधिक जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 26 फेब्रुवारी 2019 ला भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राईक करत बालाकोटमधील दहशतवादी तळ उध्वस्त केला होता.

Related Stories

‘क्राईम पेट्रोल’ मधील लोकप्रिय अभिनेते शफीक अन्सारी यांचे निधन

Rohan_P

18 वर्षांनी हैदराबादमध्ये भाजप कार्यकारिणी बैठक

Patil_p

बसपाची दहा छोट्या पक्षांसोबत युती

datta jadhav

राजस्थानात मंदिरावर ‘बुलडोझर’

Patil_p

अतिक्रमण काढल्यास जनक्षोभ निर्माण होईल !

Abhijeet Shinde

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन

datta jadhav
error: Content is protected !!