Tarun Bharat

बालायाम

जगातील बहुतांश भागात बालायाम योग हा आरोग्यदायी केसांसाठी केला जातो.  याला प्रसन्न मुद्रा असेही म्हटले जाते. 

  • बालायाम योग हा दोन शब्द बाल आणि व्यायाम यांना एकत्र करुन तयार झाला आहे. नखांवर नख घासणे हा व्यायाम रिफ्लेक्सोलॉजी थेरेपीप्रमाणे आहे. यात एकाच पद्धतीने आणि जोर लावून दोन्ही बोटांची नख एकमेकांवर घासणे याचा समावेश आहे. ऍक्यूप्रेशर उपचार पद्धतीत बालायाम योगाला खूप महत्त्व आहे.
  • आयुर्वेदाचे अनेक डॉक्टर, ऍक्यूप्रेशर पद्धतीने उपचार करणारे डॉक्टर आणि योगाचार्य हे केसाच्या आरोग्यासाठी बालायाम योग किंवा नेल रबिंग एक्सरसाईज करण्याचा सल्ला देतात. केसाची गळती, कमी वयात केस पांढरे होणे, एलोपेसिया एरिटा, टक्कल पडणे, मेंदूला पोषण देणे, निद्रानाशाची समस्या यावर बालायाम उपचार हा योग्य मानला जातो.
  • बालायाम करण्यासाठी सर्वात अगोदर आपण योगा मॅट टाकून  मनाला शांतता मिळवण्यासाठी ध्यान मुद्रा स्थितीत बसा आणि डोळे बंद करा. तीन वेळा दिर्घश्वास घ्या.
  • आता दोन्ही हातांच्या बोटांची नखे एकेमकांना स्पर्श करा. यात अंगठय़ाचा समावेश होत नाही. आता दोन्ही हाताच्या बोटांच्या नखांना एकमेकांवर घासा. दोन्ही हाताचे नख विरुद्द दिशेने खाली-वर करा. केवळ बोटांच्या नखांना एकमेकांवर घासायचे आहे. अंगठय़ाचे नख घासायचे नाही.
  • अशा प्रकारचा बालायाम योग किमान पाच ते सात मिनिटे करा.
  • बोटांची नखे एकमेकांवर जोरात घासू नका. ही प्रक्रिया आरामात करायची आहे. दोन्ही बोटांच्या नखांत चांगले घर्षण कसे होईल, याची दक्षता घ्या.
  • कोणतेही योगासन किंवा ऍक्यूप्रेशर उपचाराचा चांगला लाभ मिळण्यासाठी रिकामे पोट असणे आवश्यक आहे. त्यानुसार बालायाम योग सकाळी आणि सायंकाळी करणे अधिक फायद्याचे आहे. ते शक्य नसल्यास नियमितपणे टिव्ही पाहतांना किंवा फावल्या वेळेत किंवा सकाळच्या प्रवासातही करु शकतो.

Related Stories

फंगल इन्फेक्शन दूर करण्यास फॉलो करा ‘या’ टिप्स

Archana Banage

वैद्यकीय चाचणीत कर्करोग औषधाने पूर्णपणे बरा

Tousif Mujawar

अधोमुखवृक्षासन

Omkar B

जाणून घ्या बहुगुणी तिळाचे फायदे

Kalyani Amanagi

डोळे का फडफडतात

Amit Kulkarni

फायदे उताणे झोपण्याचे

Omkar B