Tarun Bharat

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला आठ दिवसांची पोलीस कोठडी

प्रतिनिधी / वारणानगर

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे नराधम बापाने स्वत:च्या साडेचार वर्षाच्या बालिकेवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणात जगन्नाथ यशवंत आडके याला शनिवारी न्यायालयाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

स्वतःच्या साडेचार वर्षाच्या बलिकेवर घरात व परड्यात अनैसर्गिक अत्याचार करून घरात कुणाला संगीतलेस तुला मारणार अशी धमकी दिल्याप्रकरणी नाराधम जगन्नाथ आडके यास पत्नीच्या फिर्यादीवरून अटक केली होती. आज त्याला पन्हाळा न्यायालयात हजर केले असता त्याला ३१ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

कोडोलीत साडेचार वर्षाच्या बालिकेवर बापाचा अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे वृत्त पसरताच आरोपी जगनाथच्या कृत्याबाबत कोडोलीसह सर्वत्र संताप व्यक्त होत असून आरोपीला कडक शासन व्हावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

Related Stories

शहाजी बापू काय ते ट्रॅफिक…काय तो सांगलीचा रोड

Archana Banage

गांधीजींच्या विचाराशिवाय राष्ट्रसुधारणा नाही

Archana Banage

कोल्हापूर`मनपा’ची सत्ता सेनेच्या हाती येण्यासाठी प्रयत्नशील रहा – खा. मंडलिक

Archana Banage

कोल्हापूर : अॅटीजेन किटची खरेदी प्रक्रिया पारदर्शकच

Archana Banage

कसबा बीड- सावरवाडी पंचक्रोशीत ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीने

Abhijeet Khandekar

आरयंत्राला परवानगी देण्याची सुतार-लोहार फर्निचर उद्योजक संघाची मागणी

Archana Banage