Tarun Bharat

बाळाने नकळत हाताने चक्क सापाला केला स्पर्श!

वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक

बाळ बागडताना त्याचे चित्रीकरण करावे, असे प्रत्येकालाच वाटणे सध्याच्या सोशल मीडियामुळे तर याची भुरळ सर्वांनाच लागली आहे. पण बऱयाचवेळा चित्रीकरण करताना किंवा सेल्फी काढताना हृदयाचे ठोके चुकण्याचे प्रसंग घडतात. असाच प्रसंग कंग्राळी बुद्रुक येथे शुक्रवारी घडला आणि हा व्हिडिओ बघता बघता बेळगावसह महाराष्ट्र व इतर राज्यात व्हायरल झाला.

बाळाच्या बागडण्याचे चित्रीकरण करताना बाळाच्या हाताचा नकळत भल्या मोठय़ा विषारी सापाला स्पर्श झाला आणि साऱयांचेच काळजाचे ठोके चुकले. केवळ दैव बलवत्तर म्हणून सर्पदंश झाला नाही. यातून बाळ सहिसलामत बचावले आणि ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय पुन्हा एकदा साऱयांना अनुभवयाला मिळाला.

 याची माहिती अशी की, सध्या पेरणीचा हंगाम सुरू असल्याने कलमेश्वर गल्ली येथील राजू कल्लाप्पा पाटील हे भाऊ अजित व आई शोभा यांच्यासमवेत शेतामध्ये काम करत होते. राजू यांचा दोन वर्षांचा मुलगा वेदांत याला अजित याने कौतुकाने शेताकडे आणले होते.

वेदांत बागडत असताना त्याचा व्हिडिओ काढण्याचा मोह अजित आवरू शकला नाही. त्याच्या सांगण्यानुसार वेदांत पुढे पुढे पळू लागला आणि अजित मोबाईलवरून त्याचे चित्रीकरण करू लागला. परंतु शेताच्या मधोमध वेटोळे घालून साप बसला होता. वेदांत खेळताखेळता त्या सापाजवळ आला. काही तरी वस्तू आहे म्हणून त्याने सापाला स्पर्श केला आणि अजितच्या काळजाचा ठोका चुकला. धावत जाऊन त्याने वेदांतला घेतले आणि सुटकेचा नि:श्वास टाकला. तोपर्यंत सापही तेथून गेला होता. या प्रकाराने पाटील कुटुंबीय आणि आसपासचे शेतकरी तेथे जमा झाले. वेदांतला कोठे दंश झाला आहे का, याची त्यांनी पाहणी केली. परंतु तसे कोठे आढळले नसल्याने सर्वांनाच हायसे वाटले.

वेदांतचे नशीब बलवत्तर म्हणूनच सापापासून तो बचावला. ग्रामदैवत हे कलमेश्वरच्याच कृपेमुळे माझा नातू सुखरूप बचावला. त्यामुळे मी कलमेश्वराची ऋणी आहे, असे वेदांतची आजी शोभा पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातही व्हिडिओची चर्चा सुरू

दरम्यान वेदांतने सापाला स्पर्श केल्याचा प्रसंग मोबाईलमध्ये चित्रीत झाला होता. तो आता व्हायरल झाला असून तो पाहणाऱया प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. कंग्राळीतच नव्हे तर महाराष्ट्रातसुद्धा या व्हिडिओची चर्चा सुरू आहे.

Related Stories

सरस्वतीनगरमधील ‘त्या’ रस्त्याचा वाद चिघळला

Amit Kulkarni

अगसगे येथील जलशुद्धीकरण यंत्र नादुरुस्त

Amit Kulkarni

कर्नाटक सरकारने फेस्टिवल अडव्हान्स मध्ये केली २५,००० रुपयांपर्यंत वाढ

Abhijeet Khandekar

विमा कंपन्यांचेही आंदोलन

Amit Kulkarni

अलीकडच्या काळात मळणी कामात पुरुषांपेक्षा महिलाच अधिक

Patil_p

बेळगाव जिह्यात आणखी 36 जणांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar